पृष्ठ - ०१
विक्रमी सुनीता विल्यम्स
गेल्या नोव्हेंबर महिन्यातील १९ तारखेला सुनीता विल्यम्स आपल्या १२७ दिवसांच्या अंतराळ वास्तव्यानंतर कझाकस्तानात सुखरूप उतरली. या चार महिन्यांच्या काळात तिचा मुक्काम पृथ्वीला प्रदक्षिणा घालीत असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानका’वर होता. या मुक्कामाच्या पूर्वार्धात पूर्वाधात फ्लाइट इंजिनिअर असणारी सुनीता विल्यम्स मोहिमेच्या उत्तरार्धात कमांडर या ... (पूर्ण लेखासाठी...)
शुक्राची अधिक्रमणं - इतिहासातली...
येत्या जून महिन्यात शुक्राचे अधिक्रमण घडणार आहे. हे निरीक्षण करताना, आपण एका दुर्मीळ आणि ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार ठरणार आहोत. कारण या अधिक्रमणानंतर पुनः जेव्हा हे अधिक्रमण घडून येईल, तेव्हा आज निरीक्षण करणाऱ्यांपैकी कोणीही हयात. नसेल; तसेच त्यावेळी निरीक्षण करणाऱ्यांपैकी आज ... (पूर्ण लेखासाठी...)
वेध : विश्वाच्या भवितव्याचा...
विश्वाच्या भवितव्याचा वेध घेताना विश्वातल्या दृश्यपदार्थांचे, तसेच कृष्णपदार्थांचे अस्तित्व लक्षात घ्यावे लागते. परंतु, या दोन घटकांव्यतिरिक्त आणखी एक घटकही या बाबतीत, फक्त महत्त्वाचाच नव्हे, तर निर्णायकही ठरणार आहे. भौतिकशास्त्रातील या वर्षीचे नोबेल पारितोषिक याच घटकाचे अस्तित्व दर्शवणाऱ्या शोधासाठी दिले जाणार आहे. ... (पूर्ण लेखासाठी...)
दृश्वविश्व नव्हे, कृष्णविश्व!
विज्ञान आणि तंत्रज्ञानातील विकासकार्यामुळे विश्वातील दृश्य प्रारणांबरोबरच अदृश्य प्रारणे व कण यांचा वेध घेणे आता शक्य झाले आहे. विश्वातील ९५ टक्के भाग हा कृष्णपदार्थ आणि कृष्णऊर्जेने व्यापला आहे. म्हणूनच प्रस्तुत आहे हा दृश्यविश्वाचा नव्हे, तर कृष्णविश्वाचा वेध...! ... (पूर्ण लेखासाठी...)
‘दूरदृष्टी’ गॅलिलिओची...
इ.स. २००९ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष’ म्हणून साजरं केलं गेलं. चार शतकांपूर्वी याच काळात गॅलिलिओनं दुर्बिणीतून केलेली आकाशाची निरीक्षणं, हे यामागचं कारण असल्याचं सर्वश्रुत आहे. गॅलिलिओच्या या ऐतिहासिक निरीक्षणांचं स्वरूप नेमकं काय होतं, हे स्पष्ट करणारा हा लेख. गॅलिलिओनं स्वतः केलेल्या त्यावेळच्या रेखाटनांचा या लेखात समावेश केला आहे. ... (पूर्ण लेखासाठी...)
गोष्ट क्वांटम सिद्धांताची...
विख्यात जर्मन शास्त्रज्ञ माक्स प्लांक याच्या जन्माला दिनांक २३ एप्रिल, २००९ रोजी १५१ वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त प्लांकनं संशोधलेल्या क्वांटम सिद्धान्ताचा हा सोप्या भाषेत परिचय. हा परिचय सर्वसाधारण वाचकांना समजेल अशा पद्धतीनं लिहिला असल्यानं, संबंधित संशोधनाचं वर्णन करताना मूळ... (पूर्ण लेखासाठी...)
लांबणारी वर्षं
नुकतंच संपलेलं इ.स. २००८ हे वर्ष वैशिष्ट्यपूर्ण ठरलं आहे. हे वर्ष लांबलेलं वर्ष होतं. या वर्षाचा कालावधी हा इ.स. २००७पेक्षा एक वर्ष आणि एक सेकंदाने जास्त होता. हा कालावधी जास्त असण्याचं पहिलं कारण म्हणजे या वर्षात आलेला वाढीव किंवा लीप दिवस. (पूर्ण लेखासाठी...)
तिथी - वृद्धी व क्षय
पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आहे. आपण जर पृथ्वीला सोयीसाठी स्थिर मानलं तर सूर्य आपल्याभोवती भिरतो असं आपल्याला म्हणता येतं. सूर्याची ही सापेक्ष पृथ्वीप्रदक्षिणा पृथ्वीच्या सूर्यप्रदक्षिणेच्या कालावधीइतक्या काळातच म्हणजे एक वर्षातच पूर्ण होते. सूर्याचं पृथ्वीभोवतीचं हे सापेक्ष फिरमं आकाशाच्या पार्श्वभूमीवर घडत असतं. (पूर्ण लेखासाठी...)
ओक्लोच्या अणुभट्ट्या
पश्चिम आफ्रिकेतल्या गॅबॉन या देशात अतिप्राचीन ‘अणुभट्ट्या’ सापडल्या आहेत. पृथ्वीवरील जीवसृष्टी अगदी प्राथमिक अवस्थेत होती, त्या काळातल्या या अणुभट्ट्या अर्थातच मानवनिर्मित नसून त्या निसर्गनिर्मित आहेत. ओक्लो परिसरातील युरेनियमच्या खाणीत सापडलेल्या या अणुभट्ट्या आज कार्यरत नाहीत. पण जेव्हा त्या कार्यरत होत्या, … (पूर्ण लेखासाठी...)
कृष्णविवराला ग्रहण!
दोन लक्ष प्रकाशवर्षे इतक्या व्यासाच्या आणि आपल्या गाभ्याजवळच्या परिसरातून सतत क्ष-किरणांचे उत्सर्जन करणाऱ्या दीर्घिकेच्या गाभ्याजवळूनच एक अतिशय दाट असा वायूचा ढग सरकत गेला, आणि कृष्णविवराला लागले ग्रहण!... (पूर्ण लेखासाठी...)
संपर्कः vidnyanmarg@gmail.com