पृष्ठ - ०२

अमेरिका थिजली...

अलीकडेच अमेरिकेत पडलेल्या कडाक्याच्या थंडीच्या बातम्या सतत वाचनात येत होत्या, तसंच आकाशवाणी आणि दूरदर्शनवरही प्रसारित केल्या जात होत्या. ही थंडी नेहमीची थंडी नव्हती. ही थंडी इतकी तीव्र असण्यामागे एक निश्चित स्वरूपाचे कारण होते. या कारणाचा घेतलेला हा आढावा...  (पूर्ण लेखासाठी...)

मंगळयान' मंगळाकडे...

चंद्राच्या कक्षेत यशस्विरीत्या यान पाठवल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) मंगळाच्या दिशेनं यान पाठवून पुढचं पाऊल टाकलं आहे. हे ‘मंगळयान’ दिनांक ५ नोव्हेंबर, २०१३ रोजी दुपारी ०२.३८ वाजता श्रीहरीकोटा येथून अंतराळात झेपावलं. भारताच्या या पहिल्याच आंतरग्रहीय मोहिमेतील अंतराळयानाच्या उड्डाणासाठी,  आतापर्यंत यशस्वी...  (पूर्ण लेखासाठी...)

बोल्ट नावाची वीज!

‘तो आला… तो धावला… तो जिंकला…! – हे त्याच्या बाबतीत नेहमीचंच झालं आहे. कारण, गेली अनेक वर्षं तो जिंकतोच आहे… आणि तेसुद्धा आतापर्यंतचा जगातील सर्वांत वेगवान मानव या बिरूदानिशी… या वेगवान मानवाचं नाव आहे – युसेन बोल्ट… ज्यानं आपलं नाव गेल्या दोन्ही ऑलिंपिक क्रीडास्पर्धांतील…  (पूर्ण लेखासाठी...)

सुदैवी अंतराळवीर

अंतराळवीरांना अंतराळयानाच्या बाहेर येऊन काही कामं करावी लागतात. आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकाच्या बाबतीत तर हे नेहमीचंच आहे. अंतराळवीरांचं अंतराळस्थानकाच्या बाहेर येणं, हे काही वेळा या स्थानकावर केल्या जाणाऱ्या एखाद्या नव्या भागाच्या जोडणीसाठी असू शकतं, तर काही वेळा ते स्थानकाच्या बाहेरून कराव्या लागणाऱ्या...  (पूर्ण लेखासाठी...)

आंतरराष्ट्रीय बारसं...

प्लूटोला एकूण पाच चंद्र आहेत. यांतील तीन मोठे चंद्र हे कॅरॉन, निक्स आणि हायड्रा या नावांनी ओळखले जातात. यांपैकी कॅरॉन हा गेल्या शतकात १९७८ साली शोधला गेला, तर निक्स आणि हायड्रा  यांचा शोध चालू शतकाच्या सुरुवातीला लागला. प्लूटोचे उर्वरित दोन चंद्र हे...  (पूर्ण लेखासाठी...)

सापेक्षतावादाची 'व्यापकता'...

आइन्स्टाइचा व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धान्त हा गुरुत्वाकर्षणाचाच सिद्धान्त आहे. आइन्स्टाइनच्या या सिद्धान्तानुसार प्रत्येक वस्तूचा तिच्या सभोवतालच्या अवकाशावर परिणाम होऊन त्या अवकाशाला वक्रता प्राप्त होते. वस्तूचं वस्तुमान जितकं अधिक, तितकी ही वक्रता जास्त. या वस्तूच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येणाऱ्या इतर सर्व वस्तूंचा मार्ग हा...  (पूर्ण लेखासाठी...)

नकाशातलं विश्वं...!

युरोपियन अंतराळ संघटनेच्या प्लँक अंतराळ दुर्बिणीनं विश्वाचा नकाशा तयार केला आहे. हा नकाशा साधासुधा नाही. यात आपल्या नेहमीच्या आकाशात दिसतात, तसे तारे, दीर्घिका दिसत नाहीत. कारण हा नकाशा आजच्या विश्वाचा नाही. विश्व जेव्हा अवघ्या ३,८०,००० वर्षांचं होतं, तेव्हाचा हा नकाशा आहे. आज... (पूर्ण लेखासाठी...)

अजब ताऱ्याची गजब गोष्ट...

एखाद्या वस्तूचं वय शोधून काढणं ही मुळातच आव्हानात्मक बाब. मग ती पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञाला सापडलेलं एखादं भांडं असो, उत्क्रांतिशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञाला सापडलेला जीवाश्म असो वा भूगर्भशास्त्रज्ञाला सापडलेला वैविध्यपूर्ण दगड असो. मात्र या सगळ्या वस्तू ह्या तज्ज्ञांना निदान हाताळता तरी येतात. खगोलशास्त्रज्ञांना...  (पूर्ण लेखासाठी...)

बुधाकडचा पाहुणा?

पृथ्वीवर अंतराळातून असंख्य अशनींचा सतत मारा होत असतो. खडकांच्या स्वरूपात असणाऱ्या अशनींपैकी बहुसंख्य अशनी हे आपल्याच सूर्यमालेत विहार करणाऱ्या लघुग्रहांचे तुकडे आहेत. काही अशनी मात्र चंद्र आणि मंगळासारख्या उपग्रह वा ग्रहापासून निर्माण झालेले आहेत. सूर्यमालेत फिरणारा एखादा लघुग्रह किंवा धूमकेत हा चंद्रावर...  (पूर्ण लेखासाठी...)

नील आर्मस्ट्राँगचे ते शब्द...

“That’s one small step for a man, one giant leap for mankind…” “माणसासाठी हे एक छोटंसं पाऊल आहे, मानवजातीसाठी ही प्रचंड झेप आहे…” - दिनांक २१ जुलै, १९६९ रोजी चंद्रावर आपलं पाऊल ठेवताच नील आर्मस्ट्राँगनं काढलेले हे उद्गार अजरामर झाले आहेत. …  (पूर्ण लेखासाठी...)