पृष्ठ - १८

ताऱ्याचं ग्रहभक्षण

आपल्या सूर्याचं जवळपास निम्मं आयुष्य संपलं आहे. सुमारे पाच अब्ज वर्षांनंतर सूर्य मृत्यू पावणार आहे. त्याचा परिणाम आपल्या ग्रहमालेवर अर्थातच होणार आहे. त्यातही सूर्याच्या जवळ असणाऱ्या ग्रहांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. हे कसं घडून येणार आहे, याची कल्पना देणारी एक …  (पूर्ण लेखासाठी...)

पहिले घोडेस्वार?

घोडा हा आपलं जंगली स्वरूप सोडून माणसाच्या घनिष्ट संपर्कात सर्वात प्रथम सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी आला असावा. हे घडून आलं ते बहुधा काळ्या समुद्राच्या उत्तरेला असणाऱ्या युरेशिआ स्टेप या गवताळ पठारी प्रदेशाच्या पश्चिम भागात. घोडा माणसाळला गेल्यावर त्याचा उपयोग प्रथम … (पूर्ण लेखासाठी...)

तिबेटी साप

तिबेटचं पठार म्हणजे एक आत्यंतिक परिस्थिती असणारं ठिकाण आहे. सुमारे पंचवीस लाख चौरस किलोमीटर इतक्या मोठ्या आकाराच्या या पठाराची सरासरी उंची चार हजार मीटरहून अधिक आहे. इथली हवा अत्यंत विरळ आणि थंड असते. इथलं तापमान हिवाळ्यात शून्याखाली वीस अंश सेल्सिअसच्या …  (पूर्ण लेखासाठी...)

जिवंत शुक्र!

शुक्रावर ज्वालामुखी असल्याचे अनेक पुरावे पूर्वीच मिळाले आहेत. परंतु या ज्वालामुखींच्या अलीकडच्या काळातील सक्रियतेचे पुरावे मात्र सापडले नव्हते. त्यामुळे शुक्र हा सध्याच्या काळात भूशास्त्रीयदृष्ट्या निष्क्रिय ग्रह मानला गेला होता. आता मात्र शुक्र निष्क्रिय नव्हे, तर अगदी सक्रिय असल्याचा पुरावा सापडला … (पूर्ण लेखासाठी...)

देवमाशांचा माग

देवमासे वर्षभराच्या काळात आपल्या वास्तव्याची जागा बदलत असतात. त्यांच्या वास्तव्याच्या जागेत होणारा हा बदल वेगवेगळ्या कारणांसाठी असू शकतो. काही जातींचे देवमासे हे उन्हाळ्याच्या काळात, जिथे खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं अशा किनाऱ्यापासून दूरच्या ठिकाणी जातात; तर थंडीच्या दिवसात ते प्रजोत्पादनाच्या …  (पूर्ण लेखासाठी...)

रहस्यमय मार्गिका…

इजिप्तचं वैशिष्ट्य असणाऱ्या पिरॅमिड या वास्तू, संशोधकांच्या दृष्टीनं अत्यंत कुतूहलजनक रचना ठरल्या आहेत. काही पिरॅमिडच्या आतल्या भागात थोडंफार शिरता येत असलं तरी, त्या पिरॅमिडची संपूर्ण रचना कशी आहे, त्यांतील विविध रचनांचा उद्देश काय आहे, ते अजूनही आपल्याला ठाऊक नाही. पिरॅमिडचं … (पूर्ण लेखासाठी...)

बिथोवेनचा मृत्यू

लुडविग वॅन बिथोवेन हा अभिजात पाश्चात्य संगीताच्या क्षेत्रातला एक महान संगीतकार. इ.स. १७७०मध्ये जन्मलेल्या या जर्मन संगीतकारानं आपल्या सांगीतिक कारकिर्दीत उत्तमोत्तम अशा सुमारे सातशे सांगीतिक रचना निर्माण केल्या. त्याची ही सांगीतिक कारकिर्द सुमारे पंचेचाळीस वर्षांची होती. आश्चर्य म्हणजे अशी दीर्घ …  (पूर्ण लेखासाठी...)

प्राण्यांचा जैवभार

मानवाच्या ‘अधिपत्या’खालील भूप्रदेश वाढत आहेत, जंगलं नष्ट होत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्यासुद्धा घटत आहे. विविध वन्यप्राण्यांची संख्या ही पृथ्वीवरच्या वन्यजीवनाच्या ‘प्रकृती’ची निर्देशक असते. वन्यप्राण्यांच्या संख्येवर होणारा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणून घ्यायचा असला तर, कोणत्या जातीचे किती प्राणी अस्तित्वात आहेत, हे …  (पूर्ण लेखासाठी...)

अजस्र पेंग्विन

पेंग्विन हे अंटार्क्टिकावरील जीवसृष्टीतलं एक वैशिष्ट्य आहे. मात्र या न उडणाऱ्या पक्ष्यांचं वास्तव्य फक्त अंटार्क्टिकापुरतं मर्यादित नाही. पेंग्विनच्या काही जाती अगदी विषुववृत्ताजवळच्या प्रदेशांतही आढळतात. पेंग्विनच्या आज अठरा जाती अस्तित्वात असून, त्यांतील अंटार्क्टिकावर आढळणारी एम्परर पेंग्विन ही जाती आकारानं सर्वांत मोठी …  (पूर्ण लेखासाठी...)

ममींची कार्यशाळा

ममी हा इजिप्तच्या पुरातन इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. ममी म्हणजे इजिप्तच्या राजघराण्यातील, तसंच तिथल्या सधन लोकांची, प्रक्रियेद्वारे जतन करून ठेवलेली शवं. ममीद्वारे मृताचा अनंताकडचा प्रवास सुरू होत असल्याचं मानलं जायचं. त्यामुळे ममी ही अगदी रूढीपूर्वक तयार केली जायची. ममी बनवण्याची …  (पूर्ण लेखासाठी...)