पृष्ठ - १७

‘प्रकाशलेलं’ आकाश

आकाशनिरीक्षणाच्या दृष्टीनं उत्तम आकाश म्हणजे कसं? हजारो ताऱ्यांनी गच्चं भरलेलं…  आकाशगंगेच्या पट्ट्याचं सहजपणे दर्शन देणारं… तेजस्वी ताऱ्यांपासून ते अगदी अंधूक ताऱ्यांपर्यंत सर्वांना ‘सामावून’ घेणारं! अर्थात हे वर्णन झालं शहरापासून दूरवरच्या आकाशाचं – जिथे इतर कोणत्याही प्रकाशाचा स्रोत अस्तित्वात नाही, अशा …  (पूर्ण लेखासाठी...)

रोमन काँक्रीट

सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या रोमन साम्राज्यानं मोठा भूभाग व्यापला होता. या रोमन साम्राज्याच्या खुणा आजही युरोपात भूमध्य सागराजवळच्या देशांत, तसंच उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशिआतल्या अनेक भागांत, त्याकाळच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांच्या स्वरूपात दिसून येतात. यांत रोमन लोकांनी बांधलेल्या रस्त्यांचा, बंदरांचा, …  (पूर्ण लेखासाठी...)

पाचशे दातांचा सरीसृप

जर्मनीतील बव्हेरिआ प्रांतात फ्रँकोनिअन जुरा नावाचा प्रदेश आहे. हा प्रदेश टेरोसॉर आणि तत्सम अतिप्राचीन सरीसृपांच्या अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. टेरोसॉर हे सरीसृप, डायनोसॉर या सरीसृपांचे भाऊबंद होते. ते उडणारे सरीसृप म्हणून ज्ञात आहेत. त्यांना पंख होते. मात्र हे पंख पिसांपासून बनलेले …  (पूर्ण लेखासाठी...)

आश्चर्यकारक मिश्रधातू

अतिथंड तापमानाला धातूंचे आणि मिश्रधातूंचे गुणधर्म बदलतात. सर्वसाधारण तापमानाला अतिशय उपयुक्त ठरणारा एखादा धातू वा मिश्रधातू हा अतिथंड तापमानात ठिसूळ बनतो व निरुपयोगी ठरतो. त्यामुळे अतिथंड तापमानाला वापरायच्या धातू व मिश्रधातूंवर मर्यादा येते. परंतु हा प्रश्न कदाचित नजीकच्या भविष्यात सुटण्याची …  (पूर्ण लेखासाठी...)

हिरवं ग्रीनलँड…

ग्रीनलँड हा पृथ्वीवरचा अतिउत्तरेकडचा प्रदेश आहे – उत्तर ध्रुवाजवळचा! या प्रदेशाचा उत्तरेकडचा भाग म्हणजे एक शीत मरुभूमी आहे. अत्यंत कोरडी आणि थंड हवा असणारा हा प्रदेश अगदी वैराण आहे. इथल्या जमिनीतलं पाणी हे सतत गोठलेल्या अवस्थेत असतं. इथल्या अतिप्राचीन काळातील …  (पूर्ण लेखासाठी...)

ठशांचं ‘वय’…

दोन माणसांच्या बोटांचे ठसे कधीच सारखे नसतात. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यात बोटांचे ठसे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र ठशांचा हा पुरावा फसवाही ठरू शकतो. कारण जर हे ठसे गुन्हा घडण्याच्या अगोदरच किंवा गुन्हा घडल्यानंतर उमटलेले असले, तर गुन्ह्याचा तपास चुकीच्या …  (पूर्ण लेखासाठी...)

जागृत मंगळ…

मंगळावर अनेक ज्वालामुखी आढळतात. एके काळी जागृत असलेले हे ज्वालामुखी आज मृतावस्थेत आहेत. त्यामुळे मंगळ ग्रह हा भूगर्भीयदृष्ट्या निष्क्रिय ग्रह मानला गेला आहे. मात्र नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनातून, मंगळ वाटतो तसा निष्क्रिय नसल्याचं दिसून आलं आहे. किंबहुना मंगळावर सतत भूकंप …  (पूर्ण लेखासाठी...)

अतिप्राचीन पाकशास्त्र!

आजच्या माणसाचे भाऊबंद असणारी निअँडरटाल ही जाती सुमारे चार लाख वर्षांपूर्वी निर्माण झाली आणि सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वी अस्तंगत झाली. आजचा माणूस – होमो सेपिअन्स – हा तीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आला. या दोन्ही जाती दीर्घ काळ एकाच वेळी अस्तित्वात …  (पूर्ण लेखासाठी...)

कथलाचा व्यापार

सन १९८२ मधली घटना… तुर्कस्तानच्या दक्षिण भागात, उलुबुरून म्हणून ओळखला जाणारा, भूमध्य सागरात शिरलेला एक लांबट भूभाग आहे. सागरी स्पंजाचा शोध घेताना एका पाणबुड्याला, या उलुबुरूनच्या किनाऱ्यापासून सुमारे साठ मीटर अंतरावर, समुद्राच्या तळाशी पडलेलं एक जुनं जहाज दिसलं. पन्नास-साठ मीटर …  (पूर्ण लेखासाठी...)

हिप्पार्कसचं आकाश

इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेला हिप्पार्कस हा, ग्रीक राजवटीच्या काळातील एक आघाडीचा खगोलज्ञ होता. हिप्पार्कसनं चंद्र-सूर्याच्या, आकाशाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भ्रमणाचं गणित अचूकरीत्या मांडलं. पृथ्वीचा अक्ष हा स्थिर नसून तो अंतराळात भोवऱ्यासारखा फिरत असल्याचा शोध हिप्पार्कसनंच लावला. तसंच आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांची …  (पूर्ण लेखासाठी...)