पृष्ठ - २

गुलामांचं बेट

‘सेंट हेलेना’ हे दक्षिण अटलांटिक महासागरातलं, आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून दूरवर वसलेलं, ब्रिटिश अधिपत्याखालचं एक छोटंसं बेट आहे. सुमारे १२० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या या बेटाचं, आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासूनचं अंतर सुमारे दोन हजार किलोमीटर इतकं आहे. नेपोलिअन बोनापार्ट या फ्रेंच राज्यकर्त्याचं नाव …  (पूर्ण लेखासाठी...) 

अखंड खंड…

पृथ्वी ही भौगोलिकदृष्ट्या सात खंडांत विभागली आहे. त्यातील काही खंडांचे भूभाग हे एकमेकांना जोडले आहेत, तर काही खंडांचे भूभाग एकमेकांपासून अगदी वेगळे आहेत. उदाहरणार्थ, उत्तर आणि दक्षिण अमेरीका या खंडांचा भूभाग हा युरोप, आफ्रिका आणि आशिआ या खंडांच्या भूभागापासून पूर्ण … (पूर्ण लेखासाठी...)

‘बूमरँग’ अशनी!

अशनी म्हणजे अंतराळात फिरणारे दगड-धोंडे. या अशनींपैकी काही अशनी पृथ्वीवर पोचतात. यांतील छोट्या आकाराचे अशनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोचण्यापूर्वीच जळून नष्ट होत असले, तरी मोठ्या आकाराचे अशनी हे मात्र पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोचू शकतात. असे अशनी जर वाळवंटासारख्या फिकट रंगाच्या प्रदेशात पडले, …  (पूर्ण लेखासाठी...) 

ड्रॅक्‍यूलाचे अश्रू

सन १८९७मध्ये प्रसिद्ध झालेली, ‘ड्रॅक्यूला’ ही ब्रॅम स्टॉकर यांची कादंबरी म्हणजे एक भयकथा आहे. ही कादंबरी इतकी लोकप्रिय झाली, की त्यावर अनेक चित्रपटही निघाले. या कादंबरीतलं ड्रॅक्यूला हे पात्र रक्तपिपासू आहे. हे पात्र लेखकानं, रोमानिआमधील वॉलॅशिआ प्रदेशात पंधराव्या शतकात होऊन …  (पूर्ण लेखासाठी...) 

हिरवं थर?

भारतातील विविध ठिकाणच्या नैसर्गिक परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. भारतात एका बाजूला थरच्या वाळवंटासारखे रुक्ष प्रदेश आहेत, तर दुसऱ्या बाजूला मेघालयासारखी आत्यंतिक पावसाची राज्यं आहेत. राजस्थानचा मोठा भाग व्यापणाऱ्या थरच्या वाळवंटातल्या अनेक ठिकाणचं वार्षिक पर्जन्यमान हे पंचवीस सेंटिमीटरपेक्षाही (दहा इंच) कमी … (पूर्ण लेखासाठी...)

किपचोगेचं यश

मॅरॅथॉन शर्यत ही अ‍ॅथलेटिक्समधली एक अत्यंत प्रतिष्ठेची शर्यत आहे. सुमारे बेचाळीस किलोमीटर अंतराच्या या शर्यतीत धावपटूच्या शारीरिक क्षमतेचा पूर्ण कस लागतो. साहजिकच या स्पर्धेकडे फक्त क्रीडातज्ज्ञांचंच नव्हे, तर संशोधकांचंही लक्ष असतं. गेल्या शतकाच्या सुरुवातीला सुमारे तीन तासांत पूर्ण केली जाणारी … (पूर्ण लेखासाठी...)

भूकंपाचं भाकीत

तीव्र भूकंप ही प्रचंड हाहाकार उडवणारी नैसर्गिक घटना आहे. तीव्र भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते. भूकंपाच्या काही तास अगोदरच जर या भूकंपाचं भाकीत करता आलं, तर लोकांना योग्य ती सूचना देऊन, ही जीवितहानी कमी करणं शक्य होईल. परंतु भूकंपाचं भाकीत … (पूर्ण लेखासाठी...)

महाकाय देवमासा

पृथ्वीवर आज अस्तित्वात असणारा, सगळ्यात वजनदार प्राणी म्हणजे निळा देवमासा. मात्र या देवमाशालाही वजनाच्या बाबतीत अगदी सहजपणे मागे टाकेल, असा एक देवमासा प्राचीन काळी अस्तित्वात होता. प्राचीन काळी म्हणजे खूपच पूर्वी – सुमारे चार कोटी वर्षांपूर्वी. हा देवमासा फक्त निळ्या … (पूर्ण लेखासाठी...)

प्रचंड हिरा

हिरा हे आपल्याला सुपरिचित असलेलं रत्न आहे. हिरा म्हणजे प्रत्यक्षात स्फटिकाच्या स्वरूपातला कार्बन. योग्य अशा उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची परिस्थिती निर्माण झाली, की कार्बनचं हिऱ्यात रूपांतर व्हायला लागलं. अशी परिस्थिती पृथ्वीच्या कवचाखालील भागात अस्तित्वात असते. त्यामुळे पृथ्वीच्या या अंतर्भागातील …  (पूर्ण लेखासाठी...)

पर्यावरणस्नेही लाकूड!

आजच्या औद्योगिक युगातली एक महत्त्वाची गरज म्हणजे कागद. लिखाणासाठी किंवा छपाईसाठी वापरला जाणारा कागद, वेष्टणासाठी वापरला जाणारा कागद, नॅपकिन म्हणून वापरला जाणारा कागद… अशा वेगवेगळ्या स्वरूपात कागदाचा वापर केला जातो. मात्र या कागदनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान, लाकडाच्या लगद्यातील काही पदार्थ वेगळे करून … (पूर्ण लेखासाठी...)