पृष्ठ - २१

‘हरवलेला’ खंड...

पृथ्वीचा पृष्ठभाग सतत बदलत असतो. अस्तित्वात असलेले खंड नाहीसे होत असतात, तसंच नवे खंड निर्माण होत असतात. प्राचीन काळी असाच एक गोंडवना नावाचा महाखंंड अस्तित्वात होता. या महाखंडात आजचे, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिआ हे भूप्रदेश सामावले होते. सुमारे … (पूर्ण लेखासाठी...) 

‘अतितप्त’ अ‍ॅल्टिप्लॅनो...

आपण जसे अधिकाधिक उंचीवर जाऊ, तशी हवा थंड होत जाते. त्यामुळे अतिशय उंचीवरील पठारासारख्या ठिकाणांचं किंवा उंच पर्वतांवरचं तापमान कमी झालेलं असतं. परंतु जशी उंची वाढत जाते, तसा त्या ठिकाणी होणारा सूर्यप्रकाशाचा मारा अधिकाधिक तीव्र होत जातो. तीव्र सूर्यप्रकाश झेलणारी … (पूर्ण लेखासाठी...)

जिवंत जीवाश्म!

सन १९९४ मधली गोष्ट… ऑस्ट्रेलिआतल्या सिडनीपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या, वोलेमाय राष्ट्रीय उद्यानातील डोंगरदऱ्यांतून काही जणांची भटकंती चालू होती. या भटकंतीदरम्यान, डेनिस नोबल यांना पाइनच्या प्रकारातलं एक अनोळखी सूचिपर्णी झाड आढळलं. वनस्पतिशास्त्राची ओळख असणाऱ्या डेनिस नोबेल यांना, हे झाड कोणत्यातरी …  (पूर्ण लेखासाठी...)

 स्फिंक्सची निर्मिती

इजिप्त हा देश पुरातन संस्कृतीच्या निदर्शक असणाऱ्या, विविध रचनांबद्दल प्रसिद्ध आहे. या रचनांतील एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे अर्थातच पिरॅमिड. परंतु पिरॅमिडबरोबरच तिथली जी आणखी एक लक्षवेधी रचना सुप्रसिद्ध आहे, ती म्हणजे गिझाचा ‘ग्रेट स्फिंक्स’. गिझाच्या सुप्रसिद्ध ‘ग्रेट पिरॅमिड’च्या जवळच, दक्षिण …   (पूर्ण लेखासाठी...)

अँडिझवरचे उंदीर

अतिउंचीवरील परिस्थिती ही सजीवांसाठी राहण्याच्या दृष्टीनं अत्यंत बिकट असते. अतिथंड तापमान, अत्यंत शुष्क हवा, प्राणवायूची कमतरता, खाद्याचा अभाव, अशा सर्व कारणांमुळे, अधिकाधिक उंचावर जावं तसं तिथे आढळणाऱ्या पशु-पक्ष्यांची संख्या रोडावत जाते. सहा हजार मीटर उंचीवर तर, प्राणी सापडण्याची शक्यता नगण्य …  (पूर्ण लेखासाठी...)

रेणुगंधांचा शोध...

माणूस आपल्या नाकाद्वारे विविध गंध ओळखतो, वेगवेगळ्या गंधांतला फरक सांगू शकतो. एखाद्या रसायनाचा गंध ओळखणं म्हणजे, त्या रसायनाच्या रेणूंची आपल्या घ्राणेंद्रियांशी झालेली क्रिया असते. मात्र एखाद्या रसायनाचा वास नक्की कसा आहे, हे त्या रसायनाच्या रेणूच्या रचनेवरून निश्चितपणे सांगणं, शक्य असतंच … (पूर्ण लेखासाठी...)

इशाऱ्यांची भाषा

प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींच्याही एकमेकांशी संपर्क साधण्याच्या भाषा असतात. मात्र या भाषा रासायनिक स्वरूपाच्या असतात. काही वेळा ही रसायनं या वनस्पतींच्या मुळांद्वारे जमिनीतून, तर काही वेळा पानांद्वारे हवेतून, एका वनस्पतीकडून दुसऱ्या वनस्पतीकडे पोचवली जातात. एखाद्या वनस्पतीला जेव्हा कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होतो, … (पूर्ण लेखासाठी...)

प्रतिपदार्थांचं ‘पतन’!

आपल्याभोवती आढळणाऱ्या सर्व पदार्थांप्रमाणेच प्रतिपदार्थही अस्तित्वात आहेत. प्रतिपदार्थ हा सर्वसाधारण पदार्थासारखाच असतो, परंतु त्याचे काही गुणधर्म सर्वसाधारण पदार्थाच्या गुणधर्मांच्या विरुद्ध स्वरूपाचे असतात. उदाहरण द्यायचं, तर इलेक्ट्रॉनच्या प्रतिकणाचं – प्रतिइलेक्ट्रॉनचं – देता येईल. प्रतिइलेक्ट्रॉनचं वजन नेहमीच्या इलेक्ट्रॉनच्या वजनाइतकंच आणि त्याच्यावरचा विद्युतभार …  (पूर्ण लेखासाठी...)

आर्गाइलचे गुलाबी हिरे!

पश्चिम ऑस्ट्रेलिआच्या अगदी उत्तरेला, किंबर्ली या नावाचा प्रदेश आहे. या प्रदेशातील डोंगराळ भागात, आर्गाइल या नावानं ओळखली जाणारी एक हिऱ्यांची खाण वसली आहे. या खाणीतून, जवळजवळ चार दशकं हिरे काढले जात होते. आर्थिकदृष्ट्या परवडेनाशी झाल्यामुळे, ही खाण २०२० साली बंद …  (पूर्ण लेखासाठी...)

नोबेल पारितोषिकं (२०२३)

सन २०२३ची नोबेल पारितोषिकं नुकतीच जाहीर झाली आहेत. यांतील भौतिकशास्त्रातलं पारितोषिक अणूंतील इलेक्ट्रॉनसंबधीचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या, प्रकाशस्पंदांच्या निर्मितीसाठी दिलं जाणार आहे. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक नॅनोतंत्रज्ञान ज्यावर आधारलेलं आहे, त्या अतिसूक्ष्मकणांच्या निर्मितीवरील संशोधनासाठी देण्यात येणार आहे. शरीरशास्त्र/वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे, …  (पूर्ण लेखासाठी...)