मुख्यपृष्ठ

गहाळ होणारे अशनी!

अशनी म्हणजे आपल्या सूर्यमालेतले, इतस्ततः फिरणारे, विविध दिशांनी मार्गक्रमण करणारे दगड-धोंडे. काही अशनी हे सूर्यमालेच्या जन्माच्या वेळी निर्माण न होऊ शकलेल्या एखाद्या ग्रहाचे अवशेष असतात, तर काही अशनी हे ग्रह-लघुग्रह-धूमकेतू वगैरेंच्या एकमेकांतील टकरींतून निर्माण झालेले याच घटकांचे तुकडे असतात. या अशनींपैकी काही अशनी (पूर्ण लेखासाठी...)

सॅन्टोरिनीचे उद्रेक

ग्रीस आणि तुर्कीये (तुर्कस्तान) या दोन देशांदरम्यानच्या एर्गिअन समुद्रात, पाच बेटांचा एक समूह वसला आहे. यांतील सर्वांत मोठं बेट सॅन्टोरिनी हे असून, त्याची लांबी सुमारे अठरा किलोमीटर आहे. बेटांच्या या समूहाचा आकार काहीसा वर्तुळाकार आहे. बेटांचे असे वर्तुळाकार समूह भूशास्त्रतज्ज्ञांच्या दृष्टीने  …  (पूर्ण लेखासाठी...)

त्रिमितीय’ जीवाश्म...

पृथ्वीवरच्या वृक्षांचं स्वरूप उक्रांतीद्वारे सतत बदलत आलं आहे. आज आपल्या अवतीभोवती अनेक जाती-प्रजातींचे मोठमोठे वृक्ष आढळतात. मात्र एकेकाळी पृथ्वीवर फक्त शेवाळासारख्या किंवा नेच्यांसारख्या दिसणाऱ्या, छोट्या अपुष्प वनस्पती अस्तित्वात होत्या. या वनस्पतींना वृक्षासारखं स्वरूप सुमारे अडतीस कोटी वर्षांपूर्वी प्राप्त झालं. या …  (पूर्ण लेखासाठी...)

संरक्षित भिंत

चीनच्या भिंतीला चीनच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तरेकडून होणाऱ्या भटक्या टोळ्यांचं आक्रमण रोखण्यासाठी बांधलेल्या या पूर्व-पश्चिम भिंतीची एकूण लांबी एकवीस हजार किलोमीटर इतकी प्रचंड आहे. अनेक राजवटींच्या काळात केलं गेलेलं या भिंतीचं बांधकाम, इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात सुरू होऊन ते इ.स.नंतरच्या …  (पूर्ण लेखासाठी...)

महाकपीचा शेवट

कपी हा वानरवर्गीय प्राण्यांचा एक गट आहे. या प्राण्यांची शारीरिक रचना इतर वानरवर्गीय प्राण्यांपेक्षा अनेक बाबतीत वेगळी असते. त्यांच्यातला सहजपणे लक्षात येणारा फरक म्हणजे कपींना शेपूट नसतं. आजच्या गिब्बन, चिम्पांझी, गोरिला, ओरांगउटान, तसंच मानव, या सर्वांचा या गटात समावेश होतो. …  (पूर्ण लेखासाठी...) 

सक्रिय एन्सेलॅडस

शनी या ग्रहाचे आजपर्यंत जवळपास दीडशे चंद्र शोधले गेले आहेत. या दीडशे चंद्रांपैकी एन्सेलॅडस हा चंद्र आकाराने सहाव्या क्रमाकांचा ठरतो. सुमारे ३३ तासांत शनीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करणारा, पाचशे किलोमीटर व्यासाचा हा चंद्र विल्यम हर्शलनं १७८९ साली शोधला. शनीच्या या चंद्रानं …  (पूर्ण लेखासाठी...)

पहिलं हिमायन?

पृथ्वीवर आतापर्यंत अनेकवेळा हिमयुगं येऊन गेली आहेत. या हिमयुगांतलाच, पृथ्वी मोठ्या प्रमाणात बर्फाच्छादित असण्याचा काळ म्हणजे हिमायनाचा काळ. आतापर्यंतच्या संशोधनानुसार, सर्वांत जुनं हिमायन हे सुमारे अडीच अब्ज वर्षांपूर्वी होऊन गेलं आहे. मात्र काही संशोधकांच्या मते, त्या अगोदरही कदाचित हिमायन होऊन …  (पूर्ण लेखासाठी...)

इजिप्तमधले साप...

इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीत सापांना विशेष स्थान आहे. तिथल्या पौराणिक कथांत सापांच्या रूपांतील पात्रांचा वारंवार उल्लेख केला गेला आहे. उदाहरण द्यायचं तर अ‍ॅपोफिसचं देता येईल. पाताळलोकीचा हा राजा सापाच्या रूपात वावरत असे. मात्र इजिप्तमधील सापांचं महत्त्व हे फक्त अशा पौराणिक कथांपुरतं …  (पूर्ण लेखासाठी...)