पृष्ठ - ०३
विवरांच्या शोधात...
चंद्राचा पृष्ठभाग हा असंख्य विवरांनी भरलेला आहे. यांतली काही विवरं ही अवघ्या काही सेंटिमीटर व्यासाची आहेत, तर काही विवरं ही एक हजार किलोमीटरहून अधिक व्यासाची आहेत. मंगळाचा पृष्ठभागही विवरांनी भरला आहे. मंगळावर एक किलोमीटरहून अधिक व्यासाच्या विवरांची संख्या तीन लाखांहून अधिक... (पूर्ण लेखासाठी...)
नवी क्षितिजं!
‘न्यू होरायझन्स’ या अंतराळयानाने प्लूटो आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आपला पुढील प्रवास सुरू केला आहे. एका दशकाच्या प्रवासानंतर, प्लूटोबरोबर झालेल्या या भेटीद्वारे नासाच्या न्यू होरायझन्स मोहिमेतला मुख्य टप्पा पूर्ण झाला आहे. ‘नवी क्षितिजे’ शोधणाऱ्या या यशस्वी मोहिमेची ही कहाणी... (पूर्ण लेखासाठी...)
‘टाकी’तलं वादळ...
अमेरिकेतील मायामी विद्यापीठातील सागरी हवामानाचा अभ्यास करणाऱ्या आल्फ्रेड ग्लासेल सस्टेन प्रयोगशाळेत एक मोठी टाकी बांधली आहे. या टाकीची लांबी तेवीस मीटर, रुंदी सहा मीटर आणि खोली दोन मीटर इतकी आहे. ही टाकी पारदर्शक असून या टाकीत चक्क चक्रीवादळ निर्माण करता येत! या टाकीचा... (पूर्ण लेखासाठी...)
न्यूटनची टाकसाळ
खगोलशास्त्राशी असलेलं आयझॅक न्यूटनचं नातं सर्वांना सुपरिचित आहे; परंतु त्याचा नाणेनिर्मितीशीही जवळचा संबंध आला – तोही थोडथोडक्या काळासाठी नव्हे, तर तब्बल तीन दशकांसाठी. किंबहुना, वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेल्या न्यूटननं व्यवस्थापनातलं आपलं कौशल्य या क्षेत्राद्वारे सिद्ध केलं. इ.स. १६९६ साली म्हणजे वयाच्या पंचावन्नाव्या... (पूर्ण लेखासाठी...)
रोमच्या साम्राज्याची अखेर!
एखाद्या साम्राज्याची अखेर होण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. इतिहासकार ही कारणे शोधण्याचा प्रयत्न करतातच; परंतु काही वेळा हा विषय इतिहासकारांचा वा पुरातत्त्वतज्ज्ञांचा न राहता, तो विज्ञानाच्या अखत्यारीतही येऊ शकतो. असाच प्रकार घडला आहे, तो रोमच्या साम्राज्याच्या बाततीत… (पूर्ण लेखासाठी...)
जगभरचा डेंगी
डेंगी हा रोग आज सर्वव्यापी झाला आहे. त्यामुळे त्याच्या नियंत्रणाचा आणि निर्मूलनाचा प्रश्न हा एखाददुसऱ्या देशापुरता मर्यादित राहिलेला नाही. हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न, फक्त स्थानिक स्तरावरच नाहीत, तर जागतिक स्तरावरही सातत्याने सुरू आहेत... (पूर्ण लेखासाठी...)
रोसेट्टाचं यश!
युरोपीय अंतराळ संघटनेनं पाठवलेल्या ‘रोसेट्टा’ या यानानं इतिहास घडवला आहे. एखाद्या धूमकेतूच्या केंद्रकाभोवती प्रदक्षिणा घालणारं ते पहिलं अंतराळयान ठरलं आहे! एका दशकाच्या प्रवासानंतर हे अंतराळयान गेल्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्या गंतव्यस्थानाजवळ पोहोचलं. रोसेट्टा यानाचं ‘गंतव्यस्थान’ होतं... (पूर्ण लेखासाठी...)
आइन्स्टाइनचं स्थिर-स्थिती विश्व
इस्राएलमधील जेरूसलेम विद्यापीठाच्या पुराभिलेख विभागात अल्बर्ट आइन्स्टाइ यांच्या हस्ताक्षरातील अनेक शोधनिबंध आणि पत्रं संग्रहित करून ठेवली आहेत. याच संग्रहात आइन्स्टाइन यांच्या हस्ताक्षरातील जर्मन भाषतेला ‘विश्वरचनाशास्त्राच्या प्रश्नासाठी’ या शीर्षकाखाली लिहिलेला एक चार पानांचा अप्रकाशित शोधनिबंधाचा मसुदा आहे. हे हस्तलिखित म्हणजे आइनस्टाइनच्या,... (पूर्ण लेखासाठी...)
वेगवान संदेशवहन!
दूरसंचार क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानात सतत नवे संशोधन होत आहे. आजचे तंत्रज्ञान हे उद्यासाठी जुने ठरते. दूरसंचारर क्षेत्राच्या विविध अंगांत होणाऱ्या या संशोधनातत संदेश पाठवण्याच्या वेगात वाढ करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. अशाच एका प्रयत्नांचा, दिनांक १७ मे रोजी साजऱ्या होत असलेल्या... (पूर्ण लेखासाठी...)
भूगर्भातील ऊर्जा
तीन वर्षांपूर्वी झालेल्या फुकिशिमा दुर्घटनेनंतर जपानमधील विजेची निर्मिती करणाऱ्या सर्व अणुभट्ट्या सुरक्षा-तपासणी करण्यासाठी बंद ठेवण्यात आल्या. फुकुशिमा दुर्घटनेच्या अगोदर जपानची सुमारे तीस टक्के वीजनिर्मिती ही अणुऊर्जेद्वारे होत असे. पन्नासहून अधिक अणुभट्ट्यांद्वारे होणारी ही विजेची निर्मिती बंद झाल्यामुळे जपानच्या वीजनिर्मितीवर मोठा परिणाम... (पूर्ण लेखासाठी...)
संपर्कः vidnyanmarg@gmail.com