पृष्ठ - ०५

कृष्णविवराचं चित्र

आर्थर एडिंग्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने आइन्स्टाइनच्या व्यापक सापेक्षतावादाचा पुराव शोधल्याला दिनांक २९ मे, २०१९ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. आर्थर एडिंग्टन यांनी या दिवशी केलेल्या निरीक्षणांतून, सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ताऱ्याचे दृश्यस्थान बदललेले दिसते, हे सिद्ध झाले. नंतरच्या शतकभराच्या काळात, व्यापक सापेक्षतावादाला ...  (पूर्ण लेखासाठी...)  


संजीवनी...!

व्हॉयेजर -१ आणि व्हॉयेजर -२, हा नासाची जुळी अंतराळयानं १९७७ साली अंतराळात झेपावली. गेल्या चार दशकांहून अधिक काळ चालू असलेल्या त्यांच्या प्रदीर्घ प्रवासात, ही यानं आपल्यापासून खूपच दूर गेली आहेत. इतकी की पृथ्वी-सूर्य या दरम्यानच्या अंतराच्या शंभरपटींहून अधिक दूर! आणि इतक्या ...  (पूर्ण लेखासाठी...) 

‘केपलर’चा शेवट

केपलर यान अंतराळात थंडावलं आहे... नुसतंच थंडावलं नाही तर, ते आता कायमच्या निद्रावस्थेत गेलं आहे... गेली अनेक वर्षं हे यान आपल्या तीक्ष्ण डोळ्यानं दूरच्या लाखो ताऱ्यांचा वेध घेत होतं. हा वेध घेतला जात होता, ती या ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह शोधण्यासाठी! आणि असे ...  (पूर्ण लेखासाठी...)

पुनः प्लूटो!

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेच्या, २००६ साली प्राग इथं झालेल्या सव्विसाव्या सर्वसाधारण सभेत प्लूटोला ग्रहमालेतून डच्चू दिला गेला. प्लूटोचा ग्रह हा हुद्दा काढून घेण्यात आला. प्लूटोला ग्रहाचा दर्जा देण्याविरुद्ध २३७ जणांनी, तर प्लूटोचा ग्रहाचा दर्जा राखण्याच्या बाजूनं १५७ जणांनी मत दिलं. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ... (पूर्ण लेखासाठी...)


पिकॅसोचा कॅनव्हस

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे कलेच्या क्षेत्रातील महत्त्व वादातीत आहे. परंतु, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व फक्त कलाकृतीच्या सादरीकरणापुरते किंवा ती कलाकृती जतन करण्याच्या प्रक्रियेपुरते मर्यादित नसते. अनेक वेळा विज्ञान आणि तंत्रज्ञान एखाद्या कलाकृतीमागील अज्ञात वस्तुस्थिती उघड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. याचेच एक …  (पूर्ण लेखासाठी...)

यंत्रमासा

पाण्याखालील जीवसृष्टीचा वैज्ञानिक संशोधनासाठी वेध घेणं, ही काही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. यासाठी पाण्याखाली वापरता येणारी, कॅमेरे बसवलेली वाहनं वापरली जातात. परंतु पाण्यातले मासे आणि तत्सम जीव, अशी वस्तू जवळ येताच अनेक वेळा बुजतात वा काही वेळा शत्रू समजून हल्लाही ...  (पूर्ण लेखासाठी...)


महाविनाशाची वाटचाल

एके काळी पृथ्वी ही डायनोसॉर या सरीसृप वर्गातील प्राण्यांनी व्यापली होती. सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मात्र हे अवघ्या पृथ्वीवर राज्य करणारे डायनोसॉर, एका अनाहूत पाहुण्यानं पृथ्वीला दिलेल्या धडकेमुळं अत्यल्प काळात नष्ट झाले. अंतराळातून येऊन पृथ्वीला धडक देणारा हा पाहुणा म्हणजे दहा ते पंधरा ...  (पूर्ण लेखासाठी...)

इवान इवानोविचची गोष्ट...

तुम्ही इवान इवानोविचचं नाव ऐकलंय? बहुतेक नसेलच ऐकलं! ऐकलं नसलं तर मग पुढची वाक्यं नीट लक्ष देऊन वाचा – ‘इवान इवानोविच हा पहिलावहिला अंतराळवीर होता! अगदी युरी गागारीनच्याही अगोदर अंतराळाची सफर करून आलेला… आणि तीही एकदा नव्हे तर दोनदा!’ ...  (पूर्ण लेखासाठी...)

विश्वातील कंपनांचा शोध

बरोबर एका शतकापूर्वी अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धान्त मांडला. हा सिद्धान्त म्हणजे विश्वरचनेच्या प्रारूपांचा पाया ठरला. इतकेच नव्हे तर, या व्यापक सापेक्षतावादातून वेगवेगळ्या संकल्पनांची निर्मिती झाली. त्यातलीच एक संकल्पना म्हणजे ‘गुरुत्वीय लहरी’. या लहरींचा प्रत्यक्ष शोध अनेक दशकांच्या प्रयत्नांनंतरही लागत नव्हता...  (पूर्ण लेखासाठी...)

एक गौरवशाली अखेर!

कॅसिनीचा अंत झाला. गेली तेरा वर्षं शनीभोवती सतत फेऱ्या मारणारं हे अंतराळयान अखेर शनीवरच जाऊन विसावलं. आणि त्याचबरोबर दोन दशकांच्या या कॅसिनी-हायगेन्स मोहिमेचीही अखेर झाली! हा शेवट नक्कीच दुःखद होता. परंतु हा शेवट या मोहिमेच्या यशावर कळस चढवणारा ठरला. नासा, युरोपिअन स्पेस...  (पूर्ण लेखासाठी...)