पृष्ठ - ०६

न्यूट्रॉनचा आयुष्यकाळ

अणुकेंद्रकातील न्यूट्रॉन हा अणूच्या स्थैर्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अस्थिर अणू हे किरणोत्सारी असतात व काही काळानं त्यांचं रूपांतर दुसऱ्या एखाद्या मूलद्रव्याच्या अणूंत होते. पण गंमत म्हणजे अणूंच्या स्थैर्याशी निगडीत असणारे हे कण, स्वतःच अस्थिर असतात. त्यांचं रूपांतर धनभारित …  (पूर्ण लेखासाठी...)

वणव्याची ‘उंची’

ऑस्ट्रेलियात अलीकडेच लागलेला वणवा अत्यंत भयानक होता. या वणव्यानं मोठ्या प्रमाणात वृक्षराजीचा नाश तर केलाच, परंतु त्याचबरोबर या वृक्षराजीवर अवलंबून असलेलं प्राणिजीवनही मोठ्या प्रमाणावर नष्ट केलं. कोट्यवधी चौरस किलोमीटर परिसर बेचिराख करणाऱ्या या वणव्यात निर्माण झालेल्या धूराच्या लोटांनी विक्रमी उंची …  (पूर्ण लेखासाठी...)

कुत्र्याची वाढ

कुत्र्यांचं आयुष्य हे साधारणपणे १२-१३ वर्षांचं असतं. माणसाच्या आयुष्याशी तुलना केली तर ते एक-सप्तमांश भरतं. त्यामुळे कुत्र्याच्या शारीरिक वाढीचा अंदाज बांधण्यासाठीसुद्धा अनेक वेळा, हेच एक-सप्तमांशाचं गुणोत्तर वापरलं जातं. परंतु ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निआ सॅन डिएगो’ या अमेरिकेतील विद्यापीठालील संशोधकांनी अलीकडेच केलेल्या …  (पूर्ण लेखासाठी...)

युकाटनवरचा आघात

सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक प्रचंड अशनी (उल्काश्म) आदळला. हा अशनी आदळला तो मेक्सिकोच्या पूर्वेकडील युकाटन द्वीपकल्पाजवळ. सुमारे पंधरा किलोमीटर व्यासाच्या या अशनीच्या आघाताचा परिणाम इतका भयानक होता की, त्यामुळे पृथ्वीवरील पंचाहत्तर टक्क्यांहून अधिक जीवसृष्टी नष्ट झाली. या आघातामुळे …  (पूर्ण लेखासाठी...)

माणूस कधी बोलू लागला?

माणूस कधी बोलू लागला, हा संशोधकांच्या अत्यंत उत्सुकतेचा विषय आहे. मानवी बोलण्याची सुरुवात काही अचानक झालेली नाही. मानवी बोलणं, हे मानवी उत्क्रांतीचाच एक भाग आहे. हे बोलणं अर्थातच हळूहळू विकसित होत गेलं आहे. मानवी बोलण्याची मूळं ही आजच्या होमो सेपिअन्स …  (पूर्ण लेखासाठी...)

जवळचं कृष्णविवर...

ताऱ्याच्या गाभ्यातील इंधन संपल्यानंतर त्याच्या गाभ्यातली ऊर्जानिर्मिती थांबते व त्याचा मृत्यू घडून येतो. ताऱ्याचा गाभा आता कोणत्याही अडथळ्याविना, स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामुळे आकुंचन पावू लागतो. अतिवजनदार ताऱ्याच्या बाबतीत तर तो इतका आकुंचन पावतो की, त्याची घनता अनंत होते. अनंत घनतेच्या या वस्तूचं …  (पूर्ण लेखासाठी...)

सावलीपासून वीज!

सौरऊर्जेशी आपला व्यवस्थित परिचय आहेच. यात सूर्यकिरण विशिष्ट प्रकारच्या पट्ट्यांवर पडल्यावर वीज निर्माण होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आता सावलीपासून अशी ऊर्जा निर्माण करणे शक्य झाले आहे. अर्थात अशा प्रकारे ऊर्जा निर्माण करण्यासाठी सावलीबरोबरच प्रकाशाचीही गरज असते. सावलीपासून ऊर्जा निर्माण …  (पूर्ण लेखासाठी...)

पृथ्वीचा पुनर्जन्म

पृथ्वीला लाभलेले चुंबकत्व हे पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक ठरले आहे. हे चुंबकत्व नसते तर पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यात कदाचित अडथळा निर्माण झाला असता. पृथ्वीवरचे हे चुंबकत्व वैशिष्ट्यपूर्ण आहे, ते कालानुरूप बदलत आहे. पृथ्वीच्या चुंबकत्वात होणाऱ्या या बदलांचे स्वरूप स्पष्ट करणारा हा लेख…  (पूर्ण लेखासाठी...)

पहिला रेणू

गेली पन्नास वर्षं ज्याचा शोध घेतला जात होता, तो विश्वात निर्माण झालेला पहिलावहिला रेणू संशोधकांना अखेर सापडला आहे. हा रेणू म्हणजे हायड्रोजन आणि हेलियम या दोन मूलद्रव्यांपासून निर्माण झालेला ‘हेलियम हायड्राइड’चा रेणू आहे. असं संयुग अस्तित्वात असण्याची शक्यता खगोल संशोधकांना …  (पूर्ण लेखासाठी...)

चंद्रानुभव

चंद्रावर पाऊल ठेवण्याचं भाग्य आतापर्यंत एकूण बारा जणांना लाभलंय. यांतील पहिले दोन अंतराळवीर होते अपोलो-११ मोहिमतले नील आर्मस्ट्राँग आणि एडविन अ‍ॅल्ड्रिन. या पहिल्या चंद्रावतरणाला गेल्या जुलै महिन्यात पन्नास वर्षे झाली. मानवी चंद्रावरतरणासाठी जुलै १९६९ ते डिसेंबर १९७२ या काळात अमेरिकेच्या नासातर्फे अपोलो-११ मोहिमेसह ...  (पूर्ण लेखासाठी...)

संपर्कः vidnyanmarg@gmail.com