पृष्ठ - ०७
धावणारं कृष्णविवर
आपल्या विश्वात दीर्घिकांच्या केंद्रस्थानी अतिप्रचंड वस्तुमानाची कृष्णविवरं वसली आहेत. केंद्रस्थानी असणाऱ्या या कृष्णविवरांनी दीर्घिकेतील सर्व वस्तूंना आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली जखडून ठेवलेलं असतं. दीर्घिकांचाच भाग असणारी ही कृष्णविवरं अर्थातच दीर्घिकेबरोबरच, दिर्घिकेच्या वेगानंच अंतराळात प्रवास करीत असतात. मात्र, जर एखाद्या अशा अतिप्रचंड … (पूर्ण लेखासाठी...)
चंद्राची शेपटी
धूमकेतूची शेपटी सर्वांनाच परिचित आहे. पण आपल्या चंद्रालाही शेपटी असल्याचं तुम्हाला माहीत आहे का? पृथ्वीवरून निरीक्षण करताना, ही शेपटी चंद्राभोवती अत्यंत अंधूक अशा नारिंगी रंगाच्या प्रभेच्या स्वरूपात दिसते. ही प्रभा चंद्राच्या सुमारे सहापट व्यासाची असते व ती मोठ्या दुर्बिणीतून टिपता … (पूर्ण लेखासाठी...)
आगळी दफनभूमी
पाळीव प्राण्यांबद्दलची आपुलकी व त्यायोगे त्यांना सन्मानानं वागवणं, हे काही नवं नाही. पाळीव प्राण्यांचा असा सन्मान दोन हजार वर्षांपूर्वीही राखला जात होता. याचा पुरावा म्हणजे इजिप्तमधलं बेरेनाइस या, लाल समुद्राच्या किनाऱ्यावरील पुरातन रोमन शहरातली दफनभूमी. पोलंडच्या मार्टा ओसिपिन्स्का या संशोधिकेला … (पूर्ण लेखासाठी...)
जीवनिर्मितीची बेटं
जीवसृष्टीची निर्मिती सुमारे पावणेचार अब्ज वर्षांपूर्वी झाल्याचं मानलं जातं. अत्यंत प्राथमिक अवस्थेतल्या जीवसृष्टीचे पुरावे या काळातील खडकांत मिळाले आहेत. जीवसृष्टीची ही निर्मिती होण्यासाठी अमिनो आम्लासारख्या रेणूंना एकत्र येऊन त्यापासून आरएनए, डीएनएसारख्या रेणूंची निर्मिती व्हावी लागते. ही निर्मिती अत्यंत गुंतागुंतीची आहे. … (पूर्ण लेखासाठी...)
बिळातलं जग
मॉनिटर लिझर्ड हा एक सरड्यासारखा दिसणारा सरीसृप वर्गातला प्राणी आहे. त्याच्या विविध आकाराच्या – अगदी वीस सेंटिमीटरपासून ते सुमारे तीन मीटरपर्यंत लांबीच्या – जाती अस्तित्वात आहेत. हा प्राणी मुख्यतः आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या तीन खंडांत आढळतो. बिळात राहणारे हे … (पूर्ण लेखासाठी...)
चेंगिझ खानाचा मृत्यू
राज्यकर्त्यांच्या मृत्यूचं कारण अनेक वेळा अस्पष्ट असतं. बाराव्या-तेराव्या शतकात होऊन गेलेल्या मंगोलियन सम्राट चेंगिझ खान याचा मृत्यूसुद्धा याच प्रकारातला. कॅस्पिअन समुद्रापर्यंत पसरलेल्या ‘युआन’ साम्राज्याचा संस्थापक असणारा चेंगिज खान हा मृत्यू पावला तेव्हा पासष्ट वर्षांचा होता. चेंगिझ खानाचं वायव्य चीनमधील ‘शिआ’ … (पूर्ण लेखासाठी...)
सोळाव्या शतकातले हस्तिदंत
इ.स. १५३३ साली ‘बॉम झिजस’ हे भारताकडे निघालेलं एक पोर्तुगिज जहाज आफ्रिकेच्या पश्चिमेकडील समुद्रात बुडून नष्ट झालं. त्यानंतरची जवळजवळ पावणेपाच शतकं या व्यापारी जहाजाचा कोणताही मागमूस नव्हता. इ.स. २००८ साली नामिबियातील ओरानयेमुंड या शहराजवळ, हिऱ्यांचा शोध घेणाऱ्या एका कंपनीतील भूगर्भशास्त्रज्ञांना … (पूर्ण लेखासाठी...)
अतिप्रचंड डायनोसॉर
सुमारे साडेसहा कोटी वर्षांच्या अगोदर, दीर्घ काळ पृथ्वीवर डायनोसॉर या सरीसृपांच्या गटातील प्राण्यांचं अस्तित्व होतं. जवळपास अठरा कोटी वर्ष हे प्राणी पृथ्वीवर मुक्तपणे संचार करीत होते. अनेक जाती-प्रजातींच्या स्वरूपात आढळणारे हे प्राणी अगदी काही सेंटिमीटरपासून कित्येक मीटर आकाराचे होते. त्यांची … (पूर्ण लेखासाठी...)
टोळधाडीतले टोळ...
आपल्याला गवतात एखादा टोळ नेहमीच दृष्टीस पडतो. पण जेव्हा टोळधाड येते, तेव्हा असे कोट्यवधी टोळ एकत्र येतात आणि शेतातील धान्याचा पूर्ण नाश करतात. या टोळधाडीत शेकडो चौरस किलोमीटरच्या प्रदेशातील शेतीची नासाडी होते. सर्वसाधारणपणे एकटे-दुकटे वावरणारे हे टोळ इतक्या प्रचंड संख्येत … (पूर्ण लेखासाठी...)
अणुस्फोट आणि पाऊस
पावसाळी ढगांतील पाण्याचे थेंब हे विद्युतभारित असतात. किंबहुना, धूळ किंवा हवेतील तत्सम पदार्थांवरील विद्युतभार पावसाळी ढगांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतो. तसंच ढगातील पाण्याच्या थेंबांच्या आकारावरही या विद्युतभाराचा परिणाम होत असल्यानं, या विद्युतभारावर पावसाची तीव्रता अवलंबून असते. हवामानाचा अभ्यास करणारे संशोधक … (पूर्ण लेखासाठी...)
संपर्कः vidnyanmarg@gmail.com