पृष्ठ - ०८

मधमाश्या, कबुतरं आणि आइन्स्टाइन…

ही गोष्ट आहे सात दशकांपूर्वीच्या एका छोट्याशा पत्राची. हे सुमारे नव्वद शब्दांचं छोटसं पत्र लक्षवेधी ठरलं आहे. याचं पहिलं कारण म्हणजे हे पत्र अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी लिहिलेलं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे या पत्रातून आइन्स्टाइन यांची वैज्ञानिक दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून …  (पूर्ण लेखासाठी...)

टी-रेक्सची ‘लोक’संख्या

सरीसृपांच्या वर्गातील डायनोसॉर नामक प्राण्यांनी पृथ्वीवर कित्येक कोटी वर्षं राज्य केलं. सुमारे चोवीस कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेले हे प्राणी अखेर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी नष्ट झाले. या दीर्घकाळात डायनोसॉरच्या, लहान-मोठ्या, विविध आकारांच्या, वेगवेगळ्या रंगांच्या, अशा अनेक प्रजाती निर्माण झाल्या. अनेक संशोधक …  (पूर्ण लेखासाठी...)

कोझलमधले खड्डे

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपातल्या अनेक भू-प्रदेशांनी प्रचंड प्रमाणात बाँबहल्ले सहन केले आहेत. अशा बाँबहल्ल्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागलेला एक प्रदेश म्हणजे आजच्या पोलंडमधलं कोझल खोरं. हा प्रदेश एकेकाळी नाझी जर्मनीच्या ताब्यात होता. जंगलानं झाकलेल्या या प्रदेशात जर्मनीनं तेल शुद्धीकरणाचे …  (पूर्ण लेखासाठी...)

रत्नखचित ग्रह

हिरा हा पृथ्वीवर तसा दुर्मीळच. त्यामुळेच तो अतिशय किमती. पण आपल्या ग्रहमालेपेक्षा बाहेरच्या ग्रहमालांतील अनेक ग्रह या बाबतीत बरेच श्रीमंत असण्याची शक्यता आहे. कारण इतर ताऱ्यांभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या अनेक ग्रहांवर – बाह्यग्रहांवर – हिरे मुबलक प्रमाणात आढळत असावेत. अतिशयोक्ती करून …  (पूर्ण लेखासाठी...)

आठवा खंड!

पृथ्वीवरचा भूभाग हा सात खंडांत विभागला आहे. भूप्रदेशांची ही भौगोलिक विभागणी जरी सोयीनुसार केली गेली असली तरी, त्याला भूशास्त्राचा काहीसा आधार आहेच. परंतु पूर्णपणे भूशास्त्रीय दृष्टीनं पाहायचं तर, एखाद्या भूप्रदेशाला ‘खंड’ म्हणण्यासाठी त्या भूभागाला स्वतःचं स्वतंत्र भूशास्त्रीय अस्तित्व हवं, तो …  (पूर्ण लेखासाठी...)

जड पाण्याची चव

जड पाणी हे अणुऊर्जेच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतं. नैसर्गिक युरेनियमचा अणुइंधन म्हणून वापर केल्यास, अणुभट्टीत जड पाण्याचा वापर अपरिहार्य असतो. हे जड पाणी युरेनियमच्या अणूंचं विखंडन करणाऱ्या न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी वापरलं जातं. त्याचबरोबर विविध सेंद्रिय रासायनिक अभिक्रिया अभ्यासण्यासाठी किंवा …  (पूर्ण लेखासाठी...)

कुत्र्यांशी मैत्री

बहुतेक सर्व माणसाळलेले प्राणी हे माणूस शेती करून स्थिर जीवन जगू लागल्यांनंतर माणसाळले गेले आहेत. माणसानं शेतीची सुरुवात सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी केली. शेती करण्याच्या अगोदर हजारो वर्षं माणूस हा शिकारीवर जगत होता. कुत्रा हा असा एकच प्राणी असावा की, …  (पूर्ण लेखासाठी...)

चंद्राचं कूळ

चंद्राचा ‘जन्म’ ही एक सर्वांच्याच औत्सुक्याची बाब ठरली आहे. चंद्राच्या जन्माबद्दलच्या जास्तीत जास्त स्वीकृत सिद्धांतानुसार सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी, म्हणजे पृथ्वीचा जन्म झाल्यानंतर अल्पावधीतच पृथ्वीवर एखादा, मंगळाच्या आकाराचा ग्रह आदळला असावा. या धडकेमुळे पृथ्वीचा काही भाग व या ग्रहाचा काही …  (पूर्ण लेखासाठी...)

नवं भौतिकशास्त्र?

भौतिकशास्त्रातलं ‘स्टँडर्ड मॉडेल’ हे प्रारूप विश्वातील मूलभूत कणांतील आंतरक्रियांचा वेध घेतं. या आंतरक्रियांत तीन प्रकारच्या बलांचा सहभाग असतो. ही तीन बलं म्हणजे तीव्र केंद्रकीय बल, क्षीण केंद्रकीय बल आणि विद्युतचुंबकीय बल. मूलभूत कणांपैकी, क्वार्क या मूलभूत कणापासून बनलेल्या विविध कणांना …  (पूर्ण लेखासाठी...)

तीन शतकांपूर्वीची पत्रं

दोन शतकांपूर्वीपर्यंतच्या काळात पत्र ही स्वतंत्र लिफाफ्यात ठेवून बंद करण्याची पद्धत नव्हती. त्या काळी ही पत्र विविध प्रकारे दुमडून, त्यांच्या विविध बाजू एकमेकांत अडकवून, या पत्रांना स्वतःलाच लिफाफ्यासारखं स्वरूप दिलं जायचं. यासाठी खाचा, छिद्र अशा विविध प्रकारांचाही उपयोग केला जायचा. …  (पूर्ण लेखासाठी...)