पृष्ठ - ०९

लाल बर्फ

पर्वतांवरील बर्फाच्छादित प्रदेशातून जाताना गिर्यारोहकांना काही वेळा चक्क लाल रंगाचं बर्फ पाहायला मिळतं! युरोपातील आल्प्स पर्वतात गिरीभ्रमण करणाऱ्यांना तर, उन्हाळा सुरू होण्याच्या काळात हा अनुभव बऱ्याच वेळा येऊ लागला आहे. कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत हे लाल बर्फ पसरलेलं असतं. परंतु हे …  (पूर्ण लेखासाठी...)

महात्सनामीचे पडसाद

सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेनं पृथ्वीचा कायापालट झाला. जवळजवळ पंधरा किलोमीटर आकाराचा एक प्रचंड अशनी पृथ्वीवर आदळला. मेक्सिकोच्या आखातात युकाटन द्वीपकल्पाजवळ झालेल्या या आघातामुळे, आजच्या मेक्सिकोतील चिक्क्षुलूब शहराजवळ सुमारे दीडशे किलोमीटर व्यासाचं एक मोठं विवर निर्माण झालं. लघुग्रहाच्या …  (पूर्ण लेखासाठी...)

प्राचीन वजनं

वजनांचा वापर हा व्यापाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र वजनांचा वापर करायचा तर, त्यासाठी संदर्भ म्हणून वापरल्या जाणाऱ्या एखाद्या वजनाची आवश्यकता असते. अशा प्रमाणित वजनांचा वापर केव्हापासून सुरू झाला असावा व ही वजनं प्रमाणित कशी केली गेली असावी, हा एक …  (पूर्ण लेखासाठी...)

‘थंड’ कापड

उष्ण हवामानात शरीराला थंडावा मिळण्यासाठी वेगवेगळे उपाय योजले जातात. यात आपल्या कपड्यांचं स्वरूपही महत्त्वाची भूमिका पार पाडतं. पांढऱ्या रंगाच्या पृष्ठभागावर सूर्यप्रकाश फारसा शोषला जात नसल्यानं, पांढरे कपडे वापरणं हा एक त्यावरचा उपाय आहे. परंतु निव्वळ पांढऱ्या रंगाचे कपडे वापरून शरीर …  (पूर्ण लेखासाठी...)

पाणबुड्यांची कमाल!

पाण्याखाली दीर्घकाळ वावरण्यासाठी पाणबुडे प्राणवायूनं भरलेला सिलिंडर वापरून आपली प्राणवायूची गरज भागवतात. मात्र अनुभवी पाणबुडे प्राणवायूच्या मदतीशिवाय पाण्याखाली सात-आठ मिनिटं सहज राहू शकतात. प्राणवायूची मदत न घेता, पाण्यात खोलवर सूर मारणं, हा एक साहसी क्रिडाप्रकार म्हणूनही लोकप्रिय झाला आहे. पाण्याखाली …  (पूर्ण लेखासाठी...)

प्रवासी शार्क

पक्ष्यांचं किंवा प्राण्यांचं स्थलांतर सर्वज्ञात आहे. परंतु पक्षी किंवा प्राण्यांप्रमाणे अनेक सागरी जलचरही स्थलांतर करतात. यात लहान-मोठे मासे, कासवं यांपासून देवमाशांसारख्या सस्तन प्राण्यांचाही समावेश होतो. शार्क माशांचे काही प्रकार तर, अक्षरशः कित्येक हजार किलोमीटर प्रवास करणारे जलचर म्हणून प्रसिद्ध आहेत. …  (पूर्ण लेखासाठी...)

हॉकिंगचा नियम

आइन्स्टाइन यांच्या व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धांतानं गुरुत्वाकर्षणाची व्याख्या बदलली. व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार प्रत्येक वस्तूभोवतालचं अवकाश हे वक्र झालेलं असतं. आपल्याला अभिप्रेत असलेली ‘सरळ’ रेषा ही अशा अवकाशात वक्र स्वरूपात असते. वस्तू जितकी अधिक वजनदार, तितकं तिच्याभोवतीचं अवकाश अधिक वक्र. त्या-त्या ठिकाणच्या …  (पूर्ण लेखासाठी...)

तळ्याकाठचे निअँडरटाल

निअँडरटाल ही उत्क्रांतीदरम्यान निर्माण झालेली एक मानवसदृश प्रजाती आहे. आजच्या माणसाच्या उत्क्रांतीपूर्वी निर्माण झालेली ही प्रजाती, माणूस निर्माण झाल्यानंतरही दीर्घकाळापर्यंत अस्तित्वात होती. सुमारे चार लाख वर्षांपूर्वी ही प्रजाती निर्माण झाली आणि सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वी अस्तंगत झाली. माणसापेक्षा थोडीशी वेगळी …  (पूर्ण लेखासाठी...)

वाढता लखलखाट

पृथ्वीचं तापमान वाढत आहे. त्याचे परिणाम आपण पाहतोच आहोत. याची काही उदाहरणं म्हणजे, पृथ्वीवरच्या ध्रुवप्रदेशांतील बर्फाच्छादित क्षेत्र कमी होणं, हिमनद्यांचं आकसणं, मोठ्या हिमखंडांचे आणखी तुकडे होत जाणं. गेल्या मे महिन्यात तर अंटार्क्टिकाच्या उत्तरेकडील समुद्रातल्या बर्फाच्या थराचा (रोन आइस शेल्फ), सुमारे …  (पूर्ण लेखासाठी...)

भूपृष्ठाची निर्मिती

पृथ्वीचा जन्म धूळीच्या आणि वायूच्या एका मेघातून सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला. जन्मानंतर अतितप्त असणारा हा पृथ्वीचा गोळा वितळलेल्या स्वरूपातच होता. कालांतरानं पृथ्वीचा पृष्ठभाग थंड व्हायला लागून, त्याला घन स्वरूप प्राप्त होऊ लागलं. हळूहळू या घन पृष्ठभागाची जाडी वाढत गेली …  (पूर्ण लेखासाठी...)

संपर्कः vidnyanmarg@gmail.com