पृष्ठ - १

पृथ्वीची स्पंदनं...

पृथ्वीच्या साडेचार अब्ज वर्षांच्या आयुष्याच्या काळात अनेक वेळा भूशास्त्रीय तसंच हवामानविषय प्रचंड उलथापालथी झालेल्या आहेत. या नैसर्गिक घटना पृथ्वीवरच्या जीवसृष्टीत मोठे बदल घडवून आणतात. या घटनांची संख्या ठरावीक वर्षांनी अल्प काळासाठी, एकत्रितपणे वाढत असण्याची शक्यता काही संशोधकांनी पूर्वीच व्यक्त केली …  (पूर्ण लेखासाठी...)

नोबेल पारितोषिकं (२०२१)

सन २०२१ची नोबेल पारितोषिकं जाहीर झाली आहेत. यातील शरीरशास्त्र/वैद्यकशास्त्रातील पारितोषिक हे शरीरातील जाणिवांच्या उगमस्थानावरील संशोधनासाठी दिलं जाणार आहे, तर भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे गुंतागुंतीच्या रचनांवरील संशोधनासबंधी दिलं जाणार आहे. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे सेंद्रिय उत्प्रेरकांवरील वैशिष्ट्यपूर्ण संशोधनानिमित्त दिलं जाणार आहे. …  (पूर्ण लेखासाठी...)

भाकीत – वितळणाऱ्या बर्फाचं...

पृथ्वीभोवतालच्या वातावरणाचं तापमान वाढत आहे. याचे जागतिक हवामानावर होत असलेले परिणाम तर दिसू लागले आहेतच, परंतु आर्क्टिक प्रदेशावर तर याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. इथल्या तापमानाची वाढ दुप्पट वेगानं होत आहे. त्यामुळे या प्रदेशातील बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळू लागलं …  (पूर्ण लेखासाठी...)

वर्षावनांचा कायापालट

सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर, आजच्या मध्य अमेरिकेतील चिक्क्षुलूब येथे एक प्रचंड अशनी आदळला. या अशनीनं दिलेल्या दणक्यात पृथ्वीवरची पंचाहत्तर टक्के जीवसृष्टी नष्ट झाली. पृथ्वीवरील प्राणिसृष्टीवर वर्चस्व गाजवणारे डायनोसॉर हे सरीसृप या आघातामुळे नष्ट झाले आणि सस्तन प्राणी हे, त्यानंतर …  (पूर्ण लेखासाठी...)

वूली मॅमथचा दूरसंचार!

वूली मॅमथ हा गेल्या हिमयुगातला, अंगावर केसाळ कातडी असणारा, एक प्रचंड आकाराचा सस्तन प्राणी होता. सुमारे पाच-सहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत जरी तो काही मोजक्या ठिकाणी तुरळक संख्येत अस्तित्वात असला तरी, दहा हजार वर्षांपूर्वीच तो जवळपास नामशेष झाला. गवत व इतर वनस्पतींवर …  (पूर्ण लेखासाठी...)

हायसिन – जीवसृष्टीयोग्य ग्रह...

आपल्या सूर्यमालेसारख्या, इतर ताऱ्यांभोवतालच्या अनेक ग्रहमाला आतापर्यंत शोधल्या गेल्या आहेत. या ग्रहमालांतील ग्रहांवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा शोध मोठ्या प्रमाणावर घेतला जात आहे. एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी तिथे काही गोष्टींची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, त्या ग्रहावर द्रव स्वरूपातलं पाणी उपलब्ध असायला हवं, …  (पूर्ण लेखासाठी...)

शिटीच्या भाषा

एखाद्याचं लक्ष वेधण्यासाठी, त्याला साद घालण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीला दाद देण्यासाठी तोंडानं जोरात शिटी वाजवली जाते. अशी शिटी म्हणजे फक्त एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी असतो. या शिटीत भाषेशी संबंधित कोणताही अर्थ दडलेला नसतो. सर्वसाधारणपणे अशी शिटी ही जरी अर्थहीन असली …  (पूर्ण लेखासाठी...)

वातावरणातला प्राणवायू

पृथ्वीचा जन्म होऊन सुमारे साडेचार अब्ज वर्षं झाली आहेत. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची सुरुवात पृथ्वीच्या जन्मानंतर सुमारे पाऊण अब्ज वर्षांनंतर झाली. या काळात वातावरणातील प्राणवायूचं प्रमाण एक सहस्रांश टक्क्याहूनही कमी होतं. जवळजवळ प्राणवायूविरहित असणारं हे वातावरण, पृथ्वीच्या जन्मानंतर सुमारे दोन अब्ज वर्षांपर्यंत …  (पूर्ण लेखासाठी...)

णिताची वाटचाल...

ग्रीकांना गणिताची मोठी परंपरा लाभली आहे. अगदी इ.स.पूर्व सहाव्या-सातव्या शतकातील थेलिझसारख्या गणितज्ञांपासून सुरू झालेली ही परंपरा त्यानंतर नऊ-दहा शतकं टिकून राहिली. परंतु या ग्रीक गणिताची मुळं ही ग्रीसमधली नसून, जवळच्याच मध्यपूर्व आशियातील आहेत. आजच्या इराकमध्ये पूर्वी बहरलेल्या बॅबिलोनिअन संस्कृतीतल्या गणिताचे …  (पूर्ण लेखासाठी...)

एका प्राचीन तलावाचं चरित्र...

युरोपात आणि युरोपला लागून असलेल्या आशियाई प्रदेशांत अनेक लहान-मोठे जलाशय वसले आहेत. उदाहरणार्थ, काळा समुद्र, कॅस्पिअन समुद्र, अरल समुद्र, उर्मिआ तलाव, इत्यादी. या सर्व जलाशयांचं एकमेकांशी अत्यंत जवळचं नातं आहे. हे सर्व जलाशय एकमेकांची भावंडं आहेत. कारण प्राचीन काळातल्या एका …  (पूर्ण लेखासाठी...)