पृष्ठ - ११
अंटार्क्टिकातले वणवे
अंटार्क्टिकाच्या बाबतीत ‘वणवा’ हा शब्द अनोळखी वाटतो. अंटार्क्टिकाचा अतिथंड, वृक्षविरहित प्रदेश पाहता, ते खरंही आहे. प्रत्यक्षात मात्र, एके काळी अंटार्क्टिकावरही वणवे लागत होते. मात्र हे ‘एके काळी’ म्हणजे खूपच पुरातन काळी… सुमारे सात ते आठ कोटी वर्षांपूर्वी! ज्या काळी, अंटार्क्टिका … (पूर्ण लेखासाठी...)
‘शून्य’ तापमानाकडे...
पदार्थातील अणू-रेणूंची ऊर्जा ही त्या पदार्थाच्या तापमानाची द्योतक असते. पदार्थाचं तापमान कमी करत गेल्यास, त्यातील अणू-रेणूंकडची ऊर्जा कमी होत जाते. परिणामी, त्यांची हालचालही मंदावत जाते. वायूच्या स्वरूपात असलेल्या पदार्थातील रेणूंची हालचाल जास्तीत जास्त असते. (म्हणूनच वायू सहजपणे प्रसरण पावतो.) द्रव … (पूर्ण लेखासाठी...)
अंड्यांवरचं गणित
पक्ष्यांच्या जातींनुसार त्यांच्या अंड्यांच्या आकारात विविधता असते. काही अंडी गोलाकार असतात, तर काही अंडी लांबट असतात… काही अंडी दोन्ही बाजूंना सारख्याच प्रमाणात निमुळती असतात, तर काही अंडी एका बाजूला जास्त निमुळती असतात. अंड्यांचा आकार पक्ष्याच्या जातीनुसार वेगवेगळा असला तरी, तो … (पूर्ण लेखासाठी...)
वाळवंटातल्या काचा...
दक्षिण अमेरिकेतील चिली या देशात अटाकामा नावाचं चिंचोळं, परंतु सोळाशे किलोमीटर लांबीचं एक वाळवंट आहे. या वाळंवटातील उत्तरेकडच्या पिका शहराजवळ, सुमारे पंचाहत्तर किलोमीटरच्या परिसरात सुमारे एक दशकापूर्वी, पाच वेगवेगळ्या ठिकाणी, गडद रंगाच्या काचांचे असंख्य तुकडे सापडले. दूरून खडकांसारखे दिसणारे हे … (पूर्ण लेखासाठी...)
ममींमागचे चेहरे
इजिप्तमधल्या पुरातन राजवटींतील प्रतिष्ठित घराण्यांतील अनेक व्यक्तींचे अवशेष आज ममींच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. या ममींचे मूळ चेहरे कसे दिसत असावेत, हा सामान्यांपासून ते संशोधकांपर्यंत, सर्वांच्याच कुतूहलाचा विषय आहे. या ममींचं पूर्ण शरीर उपलब्ध असलं तरी, ते कुजू नयेत म्हणून ममीत … (पूर्ण लेखासाठी...)
खोलवरचा भूकंप
दिनांक ३० मे २०१५ रोजी जपानच्या परिसरात एक भूकंप झाला. बोनिन बेटांजवळ झालेला हा भूकंप संपूर्ण जपानभर जाणवला. या भूकंपाचं केंद्र हे टोक्योच्या दक्षिणेला सुमारे आठशे किलोमीटर अंतरावर, समुद्राखालील जमिनीत होतं. हा भूकंप आठव्या प्रतीचा असला तरी, त्यामुळे झालेलं नुकसान … (पूर्ण लेखासाठी...)
आशियाचं प्रवेशद्वार
आफ्रिकेतून आशियात जाण्यासाठी माणसानं कुठला मार्ग वापरला असावा, हा मानवी उत्क्रांतीच्या दृष्टीनं पूर्वीपासून कुतूहलाचा विषय ठरला आहे. तो अरेबिआतून आशियात शिरला असण्याची शक्यता खूपच आहे. मात्र त्यानं अरेबिआ नक्की कुठून पार केला, याबद्दल संशोधकांत एकमत नाही. काही संशोधकांच्या मते तो … (पूर्ण लेखासाठी...)
शनीचा गाभा
एखादा ग्रह जर घन स्वरूपाचा असला, तर त्याची अंतर्गत रचना ओळखणं हे काहीसं सोपं ठरतं. कारण अशा ग्रहाच्या अंतर्भागात घडून येणाऱ्या घडामोडी, भूलहरींच्या स्वरूपात त्याच्या पृष्ठभागापर्यंत पोचतात. या भूलहरींचं विश्लेषण करून त्या ग्रहाचा गाभा कसा असावा, याचा अंदाज बांधता येतो. … (पूर्ण लेखासाठी...)
शहरी खाणकाम
इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यात, निरुपयोगी ठरलेल्या अनेक वस्तूंचा समावेश होतो. यांत रोजच्या वापरातल्या विविध वस्तू, संपर्काची साधनं, करमणूकीची साधनं, वैद्यकीय उपकरणं, अशा अनेक गोष्टी येतात. या कचऱ्याची विल्हेवाट लावणं, हा एक मोठा प्रश्न आहे. अशा प्रकारच्या कचऱ्यापैकी, ऐंशी टक्क्यांहून … (पूर्ण लेखासाठी...)
हरवलेलं शेपूट
‘माणसाला शेपटी का नाही?’ हा अनेकांकडून अनेकदा विचारला गेलेला प्रश्न आहे. परंतु, माणसाची शेपटी नाहीशी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण माणसाला कधी शेपटी नव्हतीच. माणसाची निर्मिती होण्याअगोदरच, माणसाच्या पूर्वजांनी ही शेपटी गमावली. या शेपटीचे अवशेष मात्र माकड हाडाच्या रूपानं मागे … (पूर्ण लेखासाठी...)
संपर्कः vidnyanmarg@gmail.com