पृष्ठ - १

टुटानखामूनचा खंजीर

टुटानखामून हा इ.स.पूर्व चौदाव्या शतकात होऊन गेलेला इजिप्तमधला फेरो. फेरो म्हणजे राजा. प्राचीन इजिप्तमधील अठराव्या राजवटीतील हा फेरो अतिशय अल्पायुषी ठरला. त्याला वयाच्या विशीतच मृत्यू आला. तरीही टुटानखामूनला इजिप्तच्या प्राचीन इतिहासात वेगळंच स्थान लाभलं आहे. याचं कारण म्हणजे  इजिप्तमध्ये लक्झॉर …  (पूर्ण लेखासाठी...)

ध्रुवीय प्रकाश – विषुववृत्ताजवळचा…

ध्रुव प्रदेशांच्या परिसरात रात्रीचं आकाश अनेक वेळा रंगीत प्रकाशानं उजळलेलं दिसतं. ध्रुव प्रदेशांत दिसणारा हा आकर्षक विविधरंगी ‘ध्रुवीय प्रकाश’ पाहण्यासाठी अनेक पर्यटक अतिउत्तरेकडील देशांचा दौरा करतात. हा ध्रुवीय प्रकाश फक्त पर्यटकांनाच नव्हे तर, संशोधकांनाही भुरळ घालणारा विषय आहे. ध्रुव प्रदेशांपासून …  (पूर्ण लेखासाठी...)

क्रांतीच्या खुणा…

वृक्ष हे भूतकाळातील हवामानाचे साक्षीदार असतात. किंबहुना ते फक्त साक्षीदारच नसतात, तर ते अशा घटनांची स्वतःकडे नोंदसुद्धा करून ठेवतात. आपल्या खोडातील वाढचक्रं ही त्यांची नोंदवही असते. वाढचक्रं म्हणजे वृक्षाच्या खोडात दिसणारी वर्तुळं. हवामानातील बदलांची नोंद ही याच वाढचक्रांत होत असते. …  (पूर्ण लेखासाठी...)

पृथ्वीचं भावंड

पृथ्वीच्या एका ‘नव्या’ भावंडाचा अलीकडेच शोध लागला आहे. हे भावंड इमानेइतबारे पृथ्वीबरोबरच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालीत आहे. ते पृथ्वीच्या मागून चालत आहे. चालताना ते पुढे-मागे जात आहे. पृथ्वीचं हे भावंड म्हणजे एक लघुग्रह आहे. हा लघुग्रह २०२०एक्सएल५ या नावानं आता ओळखला …  (पूर्ण लेखासाठी...)

पहिलं फूल?

पहिलं फूल केव्हा फुललं?’… उत्क्रांतीच्या अभ्यासकांच्या दृष्टीनं हा अतिशय उत्सुकतेचा प्रश्न आहे. सपुष्प वनस्पतींचा जन्म हा, उत्क्रांतीच्या मार्गावरचा महत्त्वाचा टप्पा असल्याचं मानलं जातं. कारण पृथ्वीवरील जैवविविधतेत सपुष्प वनस्पतींचा वाटा खूपच मोठा आहे. सपुष्प वनस्पतींची निर्मिती ही सुमारे तेरा-चौदा …  (पूर्ण लेखासाठी...)

एक अल्पायुषी बेट…

टोंगा हा दक्षिण पॅसिफिक महासागरातला एक देश आहे. ऑस्ट्रेलिआच्या पूर्वेला असणारा, एक लाख लोकसंख्येचा हा देश सुमारे १७० बेटांचा मिळून बनला आहे. या बेटांच्या परिसरात, समुद्राच्या पाण्याखाली एक ज्वालामुखी वसला आहे. आत्ताच्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात या ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक …  (पूर्ण लेखासाठी...)

सूर्याला स्पर्श!

सन १९५७ मध्ये अंतराळयुगाला सुरुवात झाली. त्यानंतरच्या गेल्या सहा दशकांच्या काळात अंतराळशास्त्रात मोठी प्रगती झाली आहे. अनेक ग्रहांवर अंतराळयानं उतरवली गेली, दूरवरच्या ग्रहांची जवळून निरीक्षणं केली गेली, काही यानं तर सर्व ग्रहांच्या कक्षा पार करून सूर्यमालेत खूप दूरपर्यंत पोचली. त्याचबरोबर …  (पूर्ण लेखासाठी...)

एक प्रदीर्घ ‘रात्र’…

पुरातन काळात पृथ्वीला एका प्रदीर्घ ‘रात्री’ला तोंड द्यावं लागलं होतं. ही प्रदीर्घ रात्र होती जवळजवळ दोन वर्षांच्या कालावधीची! ही रात्र नेहमीच्या रात्रीसारखी साधीसुधी रात्र नव्हती. ती एक काळरात्र होती… कारण या रात्रीत पृथ्वीवरच्या एकूण जीवसृष्टीपैकी सुमारे पंचाहत्तर टक्के जीवसृष्टी नष्ट …  (पूर्ण लेखासाठी...)

हिऱ्यात ‘दडलेलं’ खनिज

हिरा हे एक खनिज आहे. पूर्णपणे कार्बनपासून बनलेलं! पंरतु या हिऱ्याच्या आत काही वेळा इतर खनिजंही ‘दडलेली’ आढळतात. असंच एक हिऱ्यात दडलेलं खनिज संशोधकांना सापडलं आहे. मुख्य म्हणजे हे खनिज निसर्गात प्रथमच शोधलं गेलं आहे. इतकंच नव्हे, तर हे खनिज …  (पूर्ण लेखासाठी...)

हावी सिंफनी…

अभिजात पाश्चात्य संगीतातलं एक सुप्रसिद्ध नाव म्हणजे लुडविग वॅन बिथोवेन. इ.स. १७७०मध्ये बॉन येथे जन्मलेल्या या अत्युच्च प्रतिभेच्या जर्मन संगीतकारानं, आपल्या सुमारे पंचेचाळीस वर्षांच्या सांगीतिक कारकिर्दीत, विविध प्रकारच्या सातशेहून अधिक रचनांची निर्मिती केली. यातल्या अनेक रचना या आता अभिजात संगीताचा …  (पूर्ण लेखासाठी...)