पृष्ठ - १

चंद्रावरचं बर्फ

चंद्रावर पाणी अस्तित्वात असल्याचं पूर्वीच माहीत झालं आहे. यातलं काही पाणी हे विविध खनिजांतील पाण्याच्या रेणूंच्या स्वरूपात अस्तित्वात आहे, तर काही पाणी हे बर्फाच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. बर्फाच्या स्वरूपात अस्तित्वात असलेलं पाणी हे मुख्यतः, चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशातील विवरांच्या तळाशी वसलेलं …  (पूर्ण लेखासाठी...)

आवडणारे गंध

जास्तीत जास्त लोकांना आवडणारा गंध कोणता असावा, हा संशोधकांच्या दृष्टीनं उत्सुकतेचा प्रश्न आहे. कारण या एका प्रश्नात तीन प्रश्न दडलेले आहेत. हे तीन प्रश्न म्हणजे – एखाद्या व्यक्तीची विशिष्ट वासाची आवड ही, ती व्यक्ती ज्या संस्कृतीत वाढली त्या संस्कृतीनुसार ठरते …  (पूर्ण लेखासाठी...)

‘ऐतिहासिक’ भूकंप

अतितीव्र भूकंप हे रिश्टर मापनानुसार आठव्या किंवा त्याहून अधिक प्रतीचे असतात. गेल्या शंभर वर्षांच्या काळात जगभरात अशा सुमारे वीस अतितीव्र भूकंपांच्या नोंदी झाल्या आहेत. यापैकी सर्वांत तीव्र भूकंप हा ९.५ प्रतीचा होता. चिलीमध्ये १९६० साली झालेला हा भूकंप ‘वाल्दिविआचा भूकंप’ …  (पूर्ण लेखासाठी...)

दीर्घायुषी पोपट

आपल्याला सुपरिचित असणारा पोपट हा पक्षी संशोधकांच्या दृष्टीनं अनेक वैशिष्ट्यं बाळगून आहे. यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची उत्तम आकलनशक्ती. या उत्तम आकलनशक्तीमुळे पोपटांची आजूबाजूच्या परिस्थितीची समज, त्यांची बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाखाणण्याजोगी असते. पोपट एखाद्याच्या आवाजाची नक्कल करू शकतो, दिलेल्या सूचनांप्रमाणे …  (पूर्ण लेखासाठी...)

‘निस्तेज’ होणारी पृथ्वी

अपोलो-११ मोहिमेतून चंद्रावर पदावतरण करणाऱ्या बझ अ‍ॅल्ड्रिनला, चंद्रावरून आपली पृथ्वी ‘मखमलीवर ठेवलेल्या रत्ना’सारखी सुंदर भासली होती. परंतु हीच पृथ्वी आता निस्तेज होत चालली आहे. आश्चर्य म्हणजे पृथ्वी निस्तेज होत चालली आहे, हे ओळखलं गेलं ते खुद्द पृथ्वीवरूनच… आणि हे ओळखायला …  (पूर्ण लेखासाठी...)

मानवी वंशवृक्षाची पाळंमुळं

मानवी वंशवृक्षाचा पसारा प्रचंड आहे – तो अवघ्या जगभर पसरला आहे! तसंच मानवी वंशवृक्ष पुरातनही आहे – तो काही लाख वर्षांपूर्वी निर्माण झाला आहे! या मानवी वंशवृक्षाची वाढ कुठून, कशी होत गेली, हे शोधण्याचा प्रयत्न संशोधकांकडून गेली अनेक वर्षं केला …  (पूर्ण लेखासाठी...)

‘ऐकणारे’ कपडे

‘भिंतीला कान असतात!’ ही म्हण सुप्रसिद्ध आहे. आता ‘कपड्यांनाही कान असतात!’ अशी नवी म्हण प्रचलित झाल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण लवकरच ‘ऐकणारे’ कपडे वापरात येणार आहेत. असे कपडे शिवण्यासाठी, अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील वे यान आणि त्यांच्या …  (पूर्ण लेखासाठी...)

समुद्रतळावरचं ‘ओअ‍ॅसिस’

पृथ्वीवरचं जीवन सूर्यप्रकाशावर आधारलेलं आहे. सूर्यप्रकाशाच्या मदतीनं वनस्पती अन्नाची निर्मिती करतात व या अन्नावर इतर सजीवांची गुजराण होते. अर्थात, जिथे थोडाही सूर्यप्रकाश पोचू शकत नाही, अशा पूर्ण काळोखी जागेत राहणारे सजीवही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. अशा ठिकाणी सजीवांची विविधता मर्यादित असणं, …  (पूर्ण लेखासाठी...)

कळपातले डायनोसॉर

सजीवांच्या उत्क्रांतीत डायनोसॉर या सरीसृपांचं महत्त्व मोठं आहे. पृथ्वीवर सस्तन प्राण्यांचं राज्य येण्याच्या अगोदर, तब्बल अठरा कोटी वर्षं या डायनोसॉरनी पृथ्वीवर राज्य केलं. त्यामुळे संशोधकांना डायनोसॉरबद्दल प्राणिशास्त्राच्या दृष्टीनं उत्सुकता तर आहेच, परंतु त्यांना या प्राण्यांंच्या सामाजिक जीवनाबद्दलही कुतूहल आहे. संशोधकांना …  (पूर्ण लेखासाठी...)

बदमाश लाटा

समुद्राच्या पृष्ठभागाची लाटांच्या स्वरूपात सतत हालचाल होत असते. या लाटांची उंची ही, तिथला समुद्र शांत आहे की खवळलेला आहे, यावर अवलंबून असते. शांत समुद्रातल्या लाटांची उंची फार तर एखाद मीटर असते, खवळलेल्या समुद्रातल्या लाटा मात्र चार-पाच मीटर उंचीच्या असतात. वादळी …  (पूर्ण लेखासाठी...)

संपर्कः vidnyanmarg@gmail.com