पृष्ठ - १

मानवपूर्व अग्नी

मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासात अग्नीचा शोध अतिशय महत्त्वाचा आहे. अग्नीचा शोध म्हणजे अग्नीवरचं नियंत्रण! विविध नैसर्गिक कारणांनी लागलेल्या आगींमुळे आदिमानवाला अग्नीची ओळख पूर्वीच झाली होती. परंतु या नैसर्गिक अग्नीवर त्याचं नियंत्रण नव्हतं. स्वतःहून अग्नीची निर्मिती करता येऊ लागल्यानंतर मानवी इतिहासातला, सामाजिक …  (पूर्ण लेखासाठी...)

यलोस्टोनची गुपितं…

अमेरिकेतल्या रॉकी माउंटन्स या डोंगराळ परिसरात यलोस्टोन राष्ट्रीय उद्यान वसलं आहे. नैसर्गिक वैविध्यानं नटलेल्या या राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग, त्यातील गरम पाण्याचे कारंजे, झरे, तलाव, तसंच वाफेचे स्रोत यांसाठी जगप्रसिद्ध आहे. गरम पाण्याचे आणि वाफेचे सुमारे दहा हजार स्रोत इथे …  (पूर्ण लेखासाठी...)

लोखंडी ग्रह!

आपल्या सूर्याला जशी स्वतःची ग्रहमाला आहे, तशीच विश्वातल्या अनेक ताऱ्यांना स्वतःची ग्रहमाला आहे. आतापर्यंत अशा साडेतीन हजारांहून अधिक ग्रहमालांचा शोध लागला आहे. इतर ताऱ्यांभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या ग्रहांना ‘बाह्यग्रह’ म्हटलं जातं. या बाह्यग्रहांपैकी अनेक ग्रह हे विविध दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अशाच …  (पूर्ण लेखासाठी...)

‘हरवलेल्या’ शहरांचा शोध…

दक्षिण अमेरिकेतल्या अ‍ॅमेझॉनच्या जंगलातले काही भाग मानवी वसतीपासून इतके दूर आहेत, की त्यात काय दडलंय हे कळणं कठीणच. या प्रदेशात पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या संस्कृती होऊन गेल्या. या पूर्वीच्या संस्कृतींचे अवशेष असणारी एकटी-दुकटी काही प्राचीन बांधकामं या जंगलात आतापर्यंत सापडली आहेत. …  (पूर्ण लेखासाठी...)

डायनोसॉरचं रक्त

प्राणिजगतातील अनेक प्राण्यांच्या शरीराचा रक्त हा अविभाज्य घटक आहे. प्राणवायू तसंच विविध पोषणद्रव्यं, संप्रेरकं, चयापचयाद्वारे निर्माण झालेला कचरा, अशा पदार्थांची शरीरातल्या विविध भागांशी देवाण-घेवाण करण्याचं काम रक्ताद्वारे केलं जातं. बहुसंख्य उभयचर, सरीसृप, मासे, कीटक, यांच्या रक्ताचं तापमान हे भोवतालच्या तापमानानुसार …  (पूर्ण लेखासाठी...)

‘द्रवरूप’ प्लॅटिनम – नवा उत्प्रेरक…

प्रत्येक रासायनिक क्रिया ही वेगवेगळ्या गतीनं घडून येते. काही रासायनिक क्रिया या अल्प कालावधीत घडून येतात, तर काही रासायनिक क्रिया घडून येण्यास दीर्घ कालावधी लागतो. कोणतीही रासायनिक क्रिया उत्पादनासाठी वा अन्य व्यावहारिक कारणांसाठी वापरायची असली, तर ती क्रिया कमी वेळात …  (पूर्ण लेखासाठी...)

हिलिअमची गळती

पृथ्वीच्या वातावरणात अल्प प्रमाणात हिलिअम वायू आढळतो. या हिलिअम वायूमध्ये मुख्यतः चार अणुभार असणारे अणू असले तरी, त्यात तीन अणुभार असलेल्या हिलिअमचे अणूसुद्धा अत्यल्प प्रमाणात आढळतात. या दोन प्रकारच्या हिलिअमपैकी, चार अणुभार असलेला हिलिअम हा पृथ्वीच्या अंतर्भागातील विविध किरणोत्सर्गी मूलद्रव्यांच्या …  (पूर्ण लेखासाठी...)

थडग्यातले गंध

उत्खननात सापडलेल्या वस्तू म्हणजे त्या विशिष्ट ठिकाणच्या, जुन्या काळच्या संस्कृतीची ओळख असते. या वस्तूंद्वारे त्या-त्या संस्कृतीचा अभ्यास केला जातो. आतापर्यंत अभ्यासले जात असलेले असे पुरावे हे मुख्यतः दृश्य स्वरूपाचे होते. यापुढे या अभ्यासासाठी आणखी एक घटक उपयुक्त ठरणार आहे. हा …  (पूर्ण लेखासाठी...)

शिलारसाचा अग्निरोध!

ज्वालामुखीच्या उद्रेकात बाहेर पडणारा शिलारस अत्यंत तप्त असतो. वितळलेल्या खडकांपासून तयार झालेल्या या शिलारसाचं तापमान बाराशे अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. हा अतितप्त शिलारस जळाऊ पदार्थांना सहजपणे आगी लावू शकतो. पण आश्चर्य म्हणजे, आता याच शिलारसाचा अग्निरोधक लेप म्हणून उपयोग करता …  (पूर्ण लेखासाठी...)

प्राचीन महापर्वत!

पृथ्वीच्या पृष्ठभागात सतत बदल होत असतात. पृष्ठभागाच्या हालचालीमुळे पृथ्वीवर नवे पर्वत निर्माण होत असतात. यातले काही पर्वत छोटे असतात, तर काही पर्वत प्रचंड असतात. ऑस्ट्रेलिआतील रिसर्च स्कूल ऑफ अर्थ सायन्सेस या संस्थेतील झियी झू आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनाद्वारे, …  (पूर्ण लेखासाठी...)