पृष्ठ - १

हिमयुगातलं तापमान

गेलं हिमयुग हे सुमारे एक लाख वर्षांपूर्वी सुरू झालं आणि बारा हजार वर्षांपूर्वी संपुष्टात आलं. या हिमयुगाची कमाल शीतावस्था वीस-एकवीस हजार वर्षांपूर्वी होऊन गेल्याचं, विविध पुराव्यांद्वारे दिसून आलं आहे. या कमाल शीतावस्थेच्या काळात पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं सरासरी तापमान हे, आजच्या सुमारे …  (पूर्ण लेखासाठी...)

अचूकतेची चाचणी

गॅलिलिओनं सोळाव्या शतकाच्या अखेरीस, पिसा इथल्या झुकलेल्या मनोऱ्यावरून केलेला एक कथित प्रयोग सर्वपरिचित आहे. या प्रयोगात गॅलिलिओनं वेगवेगळ्या वजनाचे दोन गोळे पिसाच्या झुकलेल्या मनोऱ्यावरून खाली टाकले व हे गोळे जमिनीवर पोचायला लागणारा वेळ मोजला. हे गोळे जरी वेगवेगळ्या वजनाचे असले, …  (पूर्ण लेखासाठी...)

गाढवांची कहाणी

सपाट प्रदेश असो वा डोंगराळ प्रदेश असो, जंगलातला प्रदेश असो वा वैराण प्रदेश असो, उष्ण प्रदेश असो वा थंड प्रदेश असो… कोणत्याही प्रदेशातून निमूटपणे भार वाहून नेण्याचं काम करणारा प्राणी म्हणजे गाढव. घोड्याचा भाऊबंद असणारा हा प्राणी गेली हजारो वर्षं, …  (पूर्ण लेखासाठी...)

वितळणबिंदूचं भाकीत

काही संयुगांच्या बाबतीत त्यांचा वितळणबिंदू मोजणं, हे अतिशय कठीण काम असतं. मुख्यतः अतिशय उच्च तापमानाला वितळणाऱ्या असेंद्रिय संयुगांच्या बाबतीत! आतापर्यंत ज्ञात असलेल्या दोन लाखांहून अधिक असेंद्रिय संयुगांपैकी, वितळणबिंदू शोधल्या गेलेल्या संयुगांची संख्या त्यापैकी दहा टक्केही नाही. हे वितळणबिंदू माहीत नसण्यामागचं …  (पूर्ण लेखासाठी...)

नाईलचा बाहू

इजिप्तच्या इतिहासात पिरॅमिडना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. प्राचीन इजिप्तमधल्या राजघराण्यांतील व्यक्तींची थडगी असणारी ही पिरॅमिड, इजिप्तच्या चार-पाच हजार वर्षांपूर्वीपासूनच्या इतिहासाची साक्षीदार आहेत. या विविध पिरॅमिडपैकी खुफू, खाफ्री, मेनकाऊरी ही गिझाच्या पठारावर वसलेली पिरॅमिड विशेष प्रसिद्ध आहेत. ही पिरॅमिड इ.स.पूर्व सव्विसाव्या …  (पूर्ण लेखासाठी...)

अतिप्राचीन पाणी

जमिनीखाली खोलवर सापडलेल्या पाण्यात अनेकदा जीवाणू आढळतात. या जीवाणूंच्या वास्तव्याच्या जागा इतक्या खोलवर असतात की, त्या जागांचा जमिनीच्या पृष्ठभागाशी काहीच संपर्क नसतो. तरीही अशा ठिकाणी हे जीवाणू व्यवस्थितरीत्या जिवंत राहिलेले असतात. या जीवाणूंचं वास्तव्य असलेलं, जमिनीतलं खोलवरचं पाणी हे अत्यंत …  (पूर्ण लेखासाठी...)

पेंग्विनची वाटचाल

पेंग्विन हे वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आहेत. ते उत्तमरीत्या पाण्यात पोहू शकतात, परंतु अजिबात उडू शकत नाहीत. पेंग्विनना असलेले ‘पंख’ हे उडण्यासाठी नव्हे तर, पोहण्यासाठी विकसित झाले आहेत. पण आश्चर्य म्हणजे हेच पेंग्विन एके काळी उडू शकत होते. एके काळी म्हणजे खूपच …  (पूर्ण लेखासाठी...)

मंगळावरचे आवाज

पृथ्वीवर आपल्याला जसे आवाज ऐकू येतात, तसे आवाज इतर ग्रहांवरही ऐकू येतील का? या प्रश्नाचं उत्तर आहे – नक्कीच… मात्र त्यासाठी त्या ग्रहावर वातावरण असायला हवं! हे वातावरण किती विरळ आहे वा किती दाट आहे, त्यानुसार आवाजाची तीव्रता कमी किंवा …  (पूर्ण लेखासाठी...)

पहिला भक्षक?

जीवसृष्टीची निर्मिती सुमारे पावणेचार अब्ज वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर दीर्घ काळापर्यंत सजीव हे स्वतः निर्माण केलेल्या अन्नावर जगत होते. सजीवांची थेट ‘दुसऱ्याच्या जीवा’वर जगण्याची सुरुवात ही सुमारे सव्वा अब्ज वर्षांपूर्वी झाली असावी. परंतु त्या काळातले सर्व भक्षक हे अतिशय लहान आकाराचे …  (पूर्ण लेखासाठी...)

भाषांचं आकलन

एखादी भाषा जेव्हा ऐकली जाते, तेव्हा तिचं आकलन अर्थातच मेंदूद्वारे होतं. हे आकलन होताना, मेंदूच्या ठरावीक भागात विविध क्रिया घडून येतात. हे आकलन कुठे होत असावं, याची माहिती संशोधकांना आहे. तसंच, त्या मागच्या क्रियांचीही थोडीफार माहिती संशोधकांना आहे. परंतु भाषा …  (पूर्ण लेखासाठी...)