पृष्ठ - १६
जीवोत्पत्ती – किरणोत्सर्गाचा हातभार?
अमिनो आम्लं ही पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची अविभाज्य घटक आहेत. या अमिनो आम्लांपासूनच आपल्या शरीरातली विविध प्रथिनं तयार होतात. ही अमिनो आम्लं म्हणजे एक प्रकारची नायट्रोजनयुक्त आम्लं आहेत. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची सुरुवात होत होती, तेव्हा ही आम्लं अमोनिआ, मिथेन, हायड्रोजन सायनाइड, पाणी यासारख्या … (पूर्ण लेखासाठी...)
बर्फातला माणूस…
युरोपातले आल्प्स पर्वत हे भटकंतीसाठी गिर्यारोहकांत अत्यंत लोकप्रिय आहेत. ऑस्ट्रिआ, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्विट्झरलँड, इत्यादी देशांत पसरलेल्या या पर्वतरांगांत गिर्यारोहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या आल्प्स पर्वतात भटकणाऱ्या काही जर्मन गिर्यारोहकांना १९९१ सालच्या सप्टेंबर महिन्यात, इटली आणि ऑस्ट्रिआ या देशांच्या … (पूर्ण लेखासाठी...)
खचणारा पर्वत!
दक्षिण अमेरिकेतील अँडिज पर्वत ही एक लांबलचक पर्वतरांग आहे. जवळपास नऊ हजार किलोमीटर लांबीची ही उत्तर-दक्षिण पर्वतरांग सव्वातीनशे किलोमीटर रुंद असून, तिची सरासरी उंची चार हजार मीटर इतकी आहे. या पर्वताची निर्मिती सहा ते सात कोटी वर्षांपूर्वी झाली. या अँडिज पर्वताच्या … (पूर्ण लेखासाठी...)
केळ्यांतली गुंतागुंत
केळ्याचा इतिहास अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि तो गुंतागुंतीचाही आहे. केळ्याच्या आज जवळपास हजाराहून अधिक जाती-उपजाती अस्तित्वात आहेत. केळ्याचा इतिहास मांडायचा तर या विविध जाती-उपजातींचा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्ट व्हायला हवा. आजची केळी ज्या वनस्पतींपासून निर्माण झाली आहेत, त्यापैकी एक वनस्पती … (पूर्ण लेखासाठी...)
स्ट्रॅडिवरीचं व्हायोलिन
आपल्याला सुपरिचित असलेलं एक पाश्चात्य वाद्य म्हणजे व्हायोलिन. या वाद्याला सतराव्या शतकाच्या अखेरीस आजचं आधुनिक रूप प्राप्त झालं. हे रूप प्राप्त करून दिलं ते अँटोनिओ स्ट्रॅडिवरी या सुप्रसिद्ध इटालिअन वाद्यनिर्मात्यानं. स्ट्रॅडिवरी यानं पारंपरिक व्हायोलिनच्या आकारात काही बदल करून या वाद्याला … (पूर्ण लेखासाठी...)
बर्फाखालची नदी
अंटार्क्टिका खंडावरच्या जमिनीचा मोठा भाग बर्फानं व्यापला आहे. या बर्फाच्या थराखाली पाण्याचे अनेक ‘तलाव’ अस्तित्वात असल्याचं, यापूर्वीच्या संशोधनातून दिसून आलं आहे. हे तलाव बर्फाच्या तळाशी, पृष्ठभागापासून दोन ते चार किलोमीटर खोलीवर वसले आहेत. यातले काही तलाव एकमेकांना जोडले आहेत. हे … (पूर्ण लेखासाठी...)
विषारी जहाज!
इंग्लंडच्या पूर्वेला असणारा ‘नॉर्थ सी’ हा समुद्र पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावत होता. इंग्लड, फ्रान्स, बेल्जिअम, नेदरलँड्स, जर्मनी आणि डेन्मार्क या देशांना चिकटून वसलेल्या या समुद्रातून, महायुद्धांच्या काळात मोठ्या प्रमाणात युद्धनौकांचा संचार होत असे. युद्धाच्या दृष्टीनं अतिशय … (पूर्ण लेखासाठी...)
व्रेडफोर्टचं विवर
दक्षिण आफ्रिकेतल्या फ्री स्टेट इलाख्यात व्रेडफोर्ट नावाचं एक लहानसं शहर आहे. या शहराचं वैशिष्ट्य हे आहे की, हे शहर एका विवरात वसलं आहे. व्रेडफोर्टचा परिसर हा डोंगराळ भाग आहे. हा डोंगराळ भाग प्रत्यक्षात, प्राचीन काळातल्या एखाद्या ज्वालामुखीचे अवशेष असल्याची शक्यता … (पूर्ण लेखासाठी...)
द्विपाद पूर्वज
आजचा माणूस सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आला. या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे तो दोन पायांवर चालू शकत होता. पण तेव्हा माणूस हाच फक्त काही द्विपाद प्राणी नव्हता. माणूस जन्माला येण्याच्या सुमारे एक लाख वर्षं अगोदर जन्माला आलेल्या निअँडरटालसारखे, माणसाचे इतर … (पूर्ण लेखासाठी...)
नोबेल पारितोषिकं – २०२२
सन २०२२ची नोबेल पारितोषिकं नुकतीच जाहीर झाली. यांतील भौतिकशास्त्रातलं पारितोषिक पुंजवादातील गणिती निष्कर्षांना प्रयोगांद्वारे सिद्ध करून दाखवणाऱ्या संशोधनासाठी दिलं जाणार आहे. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक सोप्या रेणूंपासून गुंतागुंतीचे रेणू तयार करता येणाऱ्या पद्धतीवरील संशोधनासाठी देण्यात येणार आहे. शरीरशास्त्र/वैद्यकशास्त्रातलं पारितोषिक हे प्राचीन … (पूर्ण लेखासाठी...)
संपर्कः vidnyanmarg@gmail.com